मराठी बातम्या /बातम्या /Viral /

गृहप्रवेशाच्या 24 तासातच घर आगीच्या भक्ष्यस्थानी, घरात ही वस्तू ठेवताना 10 वेळा विचार करा

गृहप्रवेशाच्या 24 तासातच घर आगीच्या भक्ष्यस्थानी, घरात ही वस्तू ठेवताना 10 वेळा विचार करा

नव्या घरात प्रवेश करणं हा खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यातील विशेष क्षण असतो. आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशी घराची सजावट करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. परंतु, हा अनुभव एका टिकटॉकरसाठी (TikTok User) फार काळ टिकला नाही.

  मुंबई, 2 जून : नव्या घरात प्रवेश करणं हा खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यातील विशेष क्षण असतो. आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशी घराची सजावट करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. परंतु, हा अनुभव एका टिकटॉकरसाठी (TikTok User) फार काळ टिकला नाही. कारण ही महिला ज्या नवीन घरात राहायला आली ते घर विजेवरील सजावटीच्या साहित्यामुळे 24 तासांच्या आत जळून खाक झाले. ही दुःखद घटना टिकटॉक युजर @sydsacks हिने सविस्तरपणे नुकतीच कथन केली. 27 मे रोजीच्या व्हिडिओमध्ये सीदने तिच्या लिव्हिंग रूम मध्ये लावलेल्या निऑन लॅम्प मुळे (Neon Lamp) घराचे जळून कसे नुकसान झाले हे दाखवले आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ड्रॉईंग रुममध्ये असलेले आकर्षक फर्निचर दिसते. तसेच भितींवरील `चला घरातच राहू या` (Lets Stay in Home) असा संदेश असलेला गुलाबी रंगाचा निऑन लॅम्प दिसतो. माझा आनंद अल्पकाळच टिकला असं नमूद करुन तिनं असा दावा केला आहे की 14 तासांच्या आतच निऑन लॅम्पला आग (Fire) लागली. त्यानंतर त्या भिंतीवर आगीमुळे भले मोठे छिद्र पडले. तसेच आगीच्या ठिणग्या नव्याने खरेदी केलेल्या बेडवर देखील पडल्या आणि हे सर्व आगीत भस्मसात झाले.
  View this post on Instagram

  A post shared by Fail Salad (@failsalad)

  या पुढील छायाचित्रांमध्ये तिचा पाळीव कुत्रा घटनेपूर्वी बेडवर पडलेला होता. त्यानंतरच्या क्लिप्स मध्ये आग लागल्याचे दिसते. या व्हिडीओमध्ये जळालेला बेड, भिंतीला पडलेले भले मोठे छिद्र, स्प्रिंकलर सिस्टीममधून वाया जाणारे पाणी दिसते. मात्र सुदैवाने, सिस्टीम खराब झाल्याने घरात पाणी साठले परंतु, अपार्टमेंटमधील स्प्रिंकलर सिस्टीम (Sprinkler System) बंद पडली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही क्लिप @failsalad या युझरने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केली असून त्याच्या कॅप्शनमध्ये अमेझॉन कारमधून निऑन साईन्स काढून टाका असं म्हटलं आहे. जर तिचा पाळीव कुत्रा संबंधित बेडवर झोपला होता तर ही घटना घडूनही तो सुरक्षित कसा? असा प्रश्न विचारत संबंधित नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. यावर उत्तर देताना पुढील व्हिडीओत तिने स्पष्ट केले की कुत्रा ठिक आहे कारण मी मित्रांसह बाहेर जेवायला जाण्यापूर्वी माझ्या पालकांकडे त्याला सोडलं होतं. आणि कोणताही फारसा विचार न करता निऑन लॅम्प तसाच चालू ठेवला. तिने असं नमूद केलं आहे की अग्निशामक दलाच्या अधिकृत अहवालानुसार, मी अपार्टमेंट मधून बाहेर पडल्यानंतर 10 मिनिटात स्प्रिंकलर्स बंद झाले होते. या दुर्घटनेसाठी मला विमा मिळाल्याने मी कृतज्ञ आहे, मात्र पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने त्यात माझ्या घरातील फर्निचर पूर्णपणे नष्ट झाले आहे, असा दावा सीद करते.
  First published:

  Tags: Fire

  पुढील बातम्या