मराठी बातम्या /बातम्या /Viral /लग्नानंतर बायकोला आली दाढी-मिशी; नवऱ्याला मोठा धक्का, अन् रागात त्याने...

लग्नानंतर बायकोला आली दाढी-मिशी; नवऱ्याला मोठा धक्का, अन् रागात त्याने...

बायकोला आलेल्या दाढी-मिशी पाहून नवऱ्याने रागात मोठं पाऊल उचललं.

बायकोला आलेल्या दाढी-मिशी पाहून नवऱ्याने रागात मोठं पाऊल उचललं.

बायकोला आलेल्या दाढी-मिशी पाहून नवऱ्याने रागात मोठं पाऊल उचललं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

चंदीगढ, 16 मार्च :  पुरुष आणि महिला यांच्यात असलेल्या फरकांपैकी एक म्हणजे दाढी-मिशा. सामान्यपणे पुरुषांना दाढी-मिश्या असतात. महिलांना फेशिअल हेअर असतात पण पुरुषांसारख्या दाढी-मिश्या नाहीत. पण एका व्यक्तीच्या बायकोला लग्नानंतर दाढी-मिशी आली. बायकोचं असं रूप पाहून नवऱ्याला मोठा धक्का बसला. रागात त्याने मोठं पाऊल उचललं.

पंजाबमध्ये राहणारी मनदीप कौर. जिचं लग्न 2012 साली झालं. सुरुवातीला सर्वकाही ठिक होतं. काही वर्षे अगदी सुखाचा संसार सुरू होता. पण त्यानंतर मनदीपच्या चेहऱ्यावर केस येऊ लागले. पुरुषांसारखी तिला दाढी-मिशी आली. मनदीपचं असं रूप पाहून तिच्या नवऱ्याला धक्काच बसला. यामुळे मनदीप डिप्रेशनमध्ये गेली.

भांडणामुळे फळफळलं नवरा-बायकोचं नशीब; पत्नीशी भांडला आणि पती झाला करोडपती

मनदीप त्यानंतर गुरुद्वारामध्ये जाऊ लागली. तिला आपलं शरीर जसं आहे तसं स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. तिने आपल्या चेहऱ्यावरील केस काढणं बंद केलं. डोक्यावर पगडी घालू लागली. आता ती मोटारसायकल चावलते. आपल्या कमजोरीलाच तिने आपली स्टाइल बनवली आहे. जोपर्यंत ती आपल्या आवाजात बोलत नाही तोपर्यंत ती महिला आहे हे कुणालाच ओळखू येत नाही.

पुरुषांप्रमाणे महिलांना केस येणं याला हर्सुटिझम म्हणतात. शरीरात जर अँड्रोजेन या पुरुष हार्मोन्सचं प्रमाण जास्त असेल तर महिलांना पुरुषांप्रमाणे केस येतात.

महिलांना पुरुषांप्रमाणे केस येण्याची कारणे

कुशिंग सिंड्रोम - हा खूप दुर्मिळ असा सिंड्रोम आहे, 50,000 पैकी एका व्यक्तीला हा सिंड्रोम होतो. कुशिंग सिंड्रोम हा कोर्टिसोल या हार्मोनमुळे निर्माण होणारी समस्या आहे. यामुळे फक्त तुमच्या शरीरावर फक्त भरपूर केस येत नाहीत, तर वजन वाढतं, हाडं आणि स्नायू कमजोर होतात.'

एका दिवसातच नवरदेवाने आटोपला हनीमून, घरी परतताच नवरीबाईची पोलिसात धाव; FIR दाखल

पीसीओएस - अंडाशयाला सिस्ट म्हणजे छोट्या छोट्या गाठी येतात. याचा परिणाम ओव्ह्युलेशन आणि मासिक पाळीवर होतो. हार्मोन्स अनियंत्रित होतात आणि शरीरावर जास्त केस येतात.

वजन  - वजन वाढल्यानंतर तुमच्या हनुवटीवर तुम्हाला केस दिसत असतील, तर याला तुमचं वाढलेलं वजन कारणीभूत असू शकतं. वजन वाढल्याने हार्मोन्स अनियंत्रित होतात आणि केसांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. फक्त वजन वाढल्यानेच नव्हे तर वजन जास्त कमी झाल्यानेही ही समस्या उद्भवते.

वाढतं वय - जसजसं वय वाढतं, तसं शरीरावरील केसही वाढतात. विशेषत: रजोनिवृत्तीनंतर ही समस्या बळावते.

औषधं - काही विशिष्ट प्रकारची औषधं याला कारणीभूत असू शकतात.

First published:
top videos

    Tags: Couple, Health, Lifestyle, Marriage, Viral, Wife and husband