मराठी बातम्या /बातम्या /Viral /काय सांगता! महिलेला आहे चक्क 15 इंच लांब दाढी; गिनीज बुकमध्ये नोंद करण्याची इच्छा

काय सांगता! महिलेला आहे चक्क 15 इंच लांब दाढी; गिनीज बुकमध्ये नोंद करण्याची इच्छा

महिलेला आहे 15 इंच लांब दाढी

महिलेला आहे 15 इंच लांब दाढी

37 वर्षांची जेसिका तिच्या दाढी आणि मिशीमुळे चर्चेत आहे. जगातली सर्वांत लांब दाढी असलेली महिला असल्याचा तिचा दावा आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 01 फेब्रुवारी : जगात अनेक विचित्र आणि अनोख्या गोष्टी घडत असतात. तंत्रज्ञानामुळे आता त्या जगभर पोहोचू लागल्या आहेत. ही बातमी अशाच एका घटनेविषयी आहे. महिला आणि दाढी यांचा दुरान्वयेही संबंध नसताना मोठी दाढी असलेली एक महिला असल्याचं समोर आलंय. 37 वर्षांची जेसिका तिच्या दाढी आणि मिशीमुळे चर्चेत आहे. जगातली सर्वांत लांब दाढी असलेली महिला असल्याचा तिचा दावा आहे. आता तिला गिनीज बुकमध्येही विक्रमाची नोंद करायची इच्छा आहे. 'आज तक'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  जेसिका डी. जरविन्स्की नावाच्या 37 वर्षांच्या एका महिलेला दाढी आणि मिशी आहे. तिला ‘जेसा दी बीयर्डेड लेडी’ या नावानं ओळखलं जातं. तिची दाढी 15 इंच लांब आहे. जगातली सर्वांत लांब दाढी असलेली महिला असल्याचा तिचा दावा आहे. तिला गिनीज बुकमध्येही विक्रमाची नोंद करायची आहे. त्यासाठी तिला कदाचित अजून थोडा काळ वाट पाहावी लागेल. विवियन व्हिलरची दाढी तिच्यापेक्षा साडेचार इंच लांब आहे.

  हेही वाचा - हरवलेल्या रिमोटनं शोधून दिलं 13 वर्षांपूर्वीचं सामान; सोफ्यात सापडलं असं काही की फॅमिली शॉकच झाली

  जेसिकाला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आणि फायब्रोमाइल्गिया नावाचे आजार आहेत. या आजारांमुळे स्त्रियांच्या शरीरात हॉर्मोन्सचं असंतुलन होतं. फायब्रोमाइल्गिया या आजारावर वेळीच आणि योग्य उपचार मिळाले नाहीत, तर त्यामुळे हाडं खराब होतात. काही परिस्थितीत कर्करोगही होऊ शकतो. जेसिकाला अनेक शारीरिक समस्या आहेत. एका शस्त्रक्रियेत तिला एक पायही गमवावा लागला आहे. दाढी आणि मिशीमुळे तिला लोकांच्या विचित्र नजरांचा सामना करावा लागला आहे. तिला तरुण असताना लोकांनी चिडवलं, ट्रोल केलं. तिच्यावर बहिष्कारही घातला. घरगुती हिंसाचाराचा सामनाही तिला करावा लागलाय. तिला काही कारणानं अरेंज मॅरेजही करावं लागलं; मात्र तिनं स्वतःच्या या वेगळेपणालाच ताकद बनवलं. आता तिला गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदवायचा आहे.

  डेली स्टारच्या वृत्तानुसार, जेसिका सध्या 5 जणांशी पॉलिमरी रिलेशनशिपमध्ये आहे. कायदेशीर पद्धतीनं तिचं लग्न एका व्यक्तीशी झालं असलं तरी ती 5 जणांशी रिलेशनशिपमध्ये आहे. त्यात 71 वर्षांचा एक निवृत्त अमेरिकन सैनिकही आहे. तसंच एका व्यक्तीसोबत ती लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहे. तिच्या एका जोडीदारानं त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं, की आम्ही पूर्ण सहमतीनं एकमेकांचं नातं स्वीकारलं आहे. त्यामुळेच आम्ही खूप काळापासून नात्यात आहोत. पॉलिमरी रिलेशनशिपमध्ये असल्यापासून आमचं आयुष्य सुंदर झालं आहे, असं त्यानं म्हटलंय.

  जेसिकाच्या आयुष्यात अनेक चढउतार आले असले, तरी आता तिचं आयुष्य सुधारत असल्याचं ती म्हणते. आपल्या 5 प्रियकरांसोबत उत्तम आयुष्य जगत असल्याचा खुलासा ती करते.

  First published: