• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • कोथिंबीर घेऊन चर्चमध्ये पोहोचलेल्या महिलेला या कारणामुळे काढलं बाहेर, विचित्र अनुभव सांगत मांडली व्यथा

कोथिंबीर घेऊन चर्चमध्ये पोहोचलेल्या महिलेला या कारणामुळे काढलं बाहेर, विचित्र अनुभव सांगत मांडली व्यथा

ओक्लाहोमामध्ये राहणारी अश्ली एन्टीवेर्सो हिला चर्चमध्ये ड्रग्ज (Drugs in Church) आणल्याच्या आरोपात बाहेर काढण्यात आलं. अश्ली चर्चच्या बाहेर बसून रडत राहिली.

 • Share this:
  नवी दिल्ली 19 नोव्हेंबर : गैरसमजात (Misunderstanding) माणूस चुकीच्या आणि बरोबर गोष्टीतील फरक विसरून जातो. गैरसमजात अनेकदा लोक असं काहीतरी करतात ज्याची कल्पनाही आपण केलेली नसते. आपण केलेल्या चुकीची जाणीव या लोकांना नंतर होते मात्र तोपर्यंत बराच उशिर झालेला असतो. सोशल मीडियावर (Social Media) सध्या अशाच एक घटनेची चर्चा रंगली आहे. ही घटना 14 नोव्हेंबरची असल्याचं सांगितलं जात आहे. यात रविवारी एका महिलेला चर्चच्या (Church) बाहेर काढण्यात आलं. महिला चर्चच्या बाहेर बसून रडत राहिली मात्र गैरसमजामुळे कोणीच तिला चर्चमध्ये प्रवेश करू दिला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ओक्लाहोमामध्ये राहणारी अश्ली एन्टीवेर्सो हिला चर्चमध्ये ड्रग्ज (Drugs in Church) आणल्याच्या आरोपात बाहेर काढण्यात आलं. अश्ली चर्चच्या बाहेर बसून रडत राहिली. तिनं वारंवार सगळ्यांना सांगितलं की तिनं ड्रग्ज आणलेले नाहीत. मात्र कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. नंतर जेव्हा पोलीस तिथे आले तेव्हा प्रकरणाचा तपास सुरू झाला. यानंतर समजलं की हा केवळ गैरसमजाचा प्रकार आहे. अश्लीकडे ड्रग्ज नाही तर कोथिंबीर होती. रविवारी अश्लीनं बाजारातून कोथिंबीर खरेदी केली. ही कोथिंबीर घेऊनच ती Redemption United Methodist Church मध्ये गेली. याठिकाणी जाताच पादरींची नजर तिच्या हातात असलेल्या कोथिंबीरीवर पडली आणि त्यांना हा गांजा असल्याचं वाटलं. यानंतर तिला चर्चमधून बाहेर काढण्यात आलं. या घटनेबाबतचा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल झाला आहे. यात दिसतं की ही महिला वारंवार आपण काहीही गुन्हा केला नसल्याचं सांगत आहे. मात्र कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. अश्लीने वारंवार म्हटलं की तिनं ड्रग्ज आणले नसून कोथिंबीर आणली आहे. मात्र तरीही तिला चर्चमध्ये प्रवेश दिला गेला नाही. तिनं पादरींना कोथिंबीराचा वास घेण्यास सांगितलं मात्र त्यांनी तिच्यावर धर्म भ्रष्ट केल्याचा आरोप केला. प्रकरण वाढतच गेल्यानं नंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास केला. तपासात महिला निर्दोष असल्याचं समोर आलं. यानंतर चर्चच्या प्रेयरमध्ये सहभागी होण्याची परवानगी तिला देण्यात आली.
  Published by:Kiran Pharate
  First published: