Home /News /viral /

जेवणाचे फोटो काढण्यासाठी महिलेचा द्रविडी प्राणायाम; Video पाहून पोट धरून हसाल

जेवणाचे फोटो काढण्यासाठी महिलेचा द्रविडी प्राणायाम; Video पाहून पोट धरून हसाल

व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही हसू रोखू शकणार नाही.

  मुंबई, 19 मे : सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ (Viral Video on Social Media) पाहायला मिळतात.असे मजेशीर (Funny Video) आणि हैराण करणारे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की, हसून हसून पोट दुखू लागतं. सध्या फोटो आणि सेल्फी घेण्याचा ट्रेंड सुरू आहे. कुठेही गेलं तरी लोक फोटो आणि सेल्फी घेत असतात. मग वेळ आणि ठिकाणी काहीच पाहिलं जात नाही. लोक फोटो क्लिक करतात आणि तो आपल्या इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर स्टेटसवर पोस्ट करतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असच काहीसं आहे. टेबलावर जेवणं ठेवलं आहे आणि एक महिला हातात मोबाइल घेऊन दुसऱ्या टेबलवर उभी राहून जेवणाचे फोटो काढत होती. त्याच वेळी महिलेचा बॅलेन्स बिघडला आणि ती खाली पडली.
  हा व्हिडीओ जलद गतीने व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही हसू रोखू शकणार नाही. हा व्हिडीओ punjabi_industry__ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 7 हजारवेळा पाहिला गेला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पसंत करीत आहेत.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Funny video, Viral video on social media

  पुढील बातम्या