मराठी बातम्या /बातम्या /Viral /

विचित्र! कुत्र्याचा पट्टा अडकवून पतीला शहरभर फिरवलं; कारण वाचून बसेल शॉक

विचित्र! कुत्र्याचा पट्टा अडकवून पतीला शहरभर फिरवलं; कारण वाचून बसेल शॉक

(Photo- Daily Star)

(Photo- Daily Star)

Viral Story: सध्या सोशल मीडियावर काही फोटो वेगानं व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यामध्ये एक महिला आपल्या पतीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा अडकवून (tied dog's belt in husband's neck) त्याला संपूर्ण शहरभर फिरवत आहेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर: सध्या सोशल मीडियावर काही फोटो वेगानं व्हायरल (Viral Photos) होताना दिसत आहेत. ज्यामध्ये एक महिला आपल्या पतीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा अडकवून (tied dog's belt in husband's neck) त्याला संपूर्ण शहरभर फिरवत आहेत. संबंधित फोटो व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियात नेटकऱ्यांनी महिलेला ट्रोल करायला सुरुवात केलं आहे. ट्रोल झाल्यानंतर संबंधित महिलेनं स्पष्टीकरण दिलं असून असं करण्यामागचं विचित्र कारण दिलं आहे. महिलेनं दिलेल्या स्पष्टीकरण ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय आहे...

डेलीस्टारने दिलेल्या वृत्तानुसार संबंधित घटना ब्राझीलमधील (Brazil) आहे. तर संबंधित महिलेचं नाव लुआना कझाकी (Luana Kazaki) आणि तिच्या नवऱ्याचं नाव आर्थर ओउर्सो (Arthur O Urso) असं आहे. संबंधित दोघंजण ब्राझीलमधील वर्दळीच्या ठिकाणी फोटोशूट करताना दिसले आहे. त्यांनी रेल्वे स्थानक, रस्ते, मॉल आणि हॉटेलात फोटो काढताना दिसले आहे. संबंधित फोटोमध्ये लुआना आपल्या पतीला कुत्र्यासारखं वागणूक देताना दिसत आहे.

हेही वाचा-आपल्याच नवजात बाळाला पाहून घाबरली महिला; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

पती आर्थरच्या गळ्यात लोखंडी साखळी बांधलेली असून ती साखळी पत्नी लुआनानं धरली आहे. ती आर्थरच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला विविध ठिकाणी फिरवताना दिसली आहे. यावेळी आर्थरच्या चेहऱ्यावर मास्क होता. याबाबत स्पष्टीकरण देताना लुआना कझाकीनं सांगितलं की, दोघांमधील 'प्रेम आणि रोमान्स' वाढवण्यासाठी हे कृत्य केलं आहे. त्यामुळे 'लोक काय विचार करतील, याची मला अजिबात पर्वा नाही. मी कोणतंही बेकायदेशीर काम केलं नाही. कोणालाही न दुखावता आम्ही हे काम केलं आहे. आमचा असा विश्वास आहे, की यामुळे आमच्या दोघांमधील प्रेम आणि कामवासना वाढते.

लुआना तिचा नवरा आर्थरच्या गळ्यात कुत्र्याच्या पट्टा बांधून फिरवताना दिसली आहे. या जोडप्यानं गर्दीच्या ठिकाणी जाऊन फोटोशूटही केलं आहे. अनेक फोटोंमध्ये लुआनाचा पती कुत्र्यासारखा जमिनीवर बसलेला दिसत, याचे काही फोटो समोर आले असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहेत.

First published:

Tags: Photo viral