Home /News /viral /

आपल्याच मैत्रिणीच्या जुळ्या मुलांचा बाप बनणार आहे हा व्यक्ती; पत्नीला समजताच ओढावलं मोठं संकट

आपल्याच मैत्रिणीच्या जुळ्या मुलांचा बाप बनणार आहे हा व्यक्ती; पत्नीला समजताच ओढावलं मोठं संकट

30 वर्षांची एक महिला अशा पुरुषाच्या शोधात होती ज्याचं आरोग्य अतिशय चांगलं आहे आणि कोणतीही वाईट मेडिकल हिस्ट्री नाही. अशा परिस्थितीत तिने आपल्या एका मित्रावर विश्वास व्यक्त करत त्याला स्पर्म डोनर बनण्यास सांगितलं.

    नवी दिल्ली 22 एप्रिल : अनेकवेळा जेव्हा एखादी महिला नैसर्गिकरित्या आई होऊ (Pregnancy) शकत नाही, तेव्हा IVF तंत्राचा वापर केला जातो. अशाच एका महिलेला जेव्हा समजलं की ती आई होऊ शकत नाही, तेव्हा तिने आई बनण्यासाठी स्पर्म डोनरची मदत घेतली (Sperm Donor). आता आपल्या मित्राकडून घेतलेल्या स्पर्ममुळे ती महिला जुळ्या मुलांची आई होणार आहे, मात्र तिच्या जिवलग मित्राच्या पत्नीला ही बाब माहिती नव्हती. बापरे! इवल्याशा उंदराचा एवढा मोठा प्रताप; एअर इंडियाच्या विमानात घातला धुमाकूळ, वाचा पुढे काय घडलं मिररच्या रिपोर्टनुसार, 30 वर्षांची एक महिला अशा पुरुषाच्या शोधात होती ज्याचं आरोग्य अतिशय चांगलं आहे आणि कोणतीही वाईट मेडिकल हिस्ट्री नाही. अशा परिस्थितीत तिने आपल्या एका मित्रावर विश्वास व्यक्त करत त्याला स्पर्म डोनर बनण्यास सांगितलं. तिच्या मित्रानेही बाप म्हणून कोणतंही कर्तव्य बजावणार नाही या अटीवर मुलाचे वडील होण्याचं मान्य केलं. महिलेचा हा मित्र हायस्कूलपासून तिच्या सोबत आहे. महिलेने IVF द्वारे गर्भधारणा केली, आता ती लवकरच 2 मुलांची आई होणार आहे. मात्र आपण मैत्रिणीला स्पर्म दिल्याचं तिच्या मित्राने आपल्या बायकोपासून लपवलं होतं. ही बाब गरोदर महिलेला माहिती नव्हती. महिलेनं आपल्यासोबत घडलेली ही घटना ऑनलाईन प्लॅटफॉर्म Reddit वर शेअर केली आहे. तिने जेव्हा आपल्या मित्राचे आभार मानण्यासाठी त्याला आणि त्याच्या पत्नीला डिनरसाठी घरी बोलावलं तेव्हा तिला समजलं की त्याच्या पत्नीला याबद्दल काहीही माहिती नाही. अरे यार Girlfriend सोबत असं कोणता Boyfriend करतो? VIDEO चा शेवट पाहून तुम्हीही हादराल महिलेच्या मित्राच्या पत्नीला हा प्रकार कळताच तिला आधी धक्का बसला आणि नंतर आपल्याला याची माहिती नसल्याचं सांगताना ती प्रचंड भडकली. या प्रकरणावरून तिघांमध्ये बराच वाद झाल्याचं या महिलेनं सांगितलं. याप्रकरणी आपल्याशी काहीही चर्चा न केल्याचा आरोप मित्राच्या पत्नीने केला. Reddit वर यावर प्रतिक्रिया देताना लोकांनी म्हटलं की यात तुझी चूक नाही आणि तुझ्या मित्राच्या पत्नीशी याबद्दल बोलण्याची तुला काहाही आवश्यकता नाही. काही लोकांनी तर महिलेला कायदेशीर आधार घेण्याचा सल्लाही दिला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Pregnant woman, Shocking news

    पुढील बातम्या