मराठी बातम्या /बातम्या /Viral /एक झाडं चोरण्यासाठी एवढा आटापिटा? कारमधून आलेल्या महिलेचा कारनामा पाहून व्हाल थक्क, VIDEO

एक झाडं चोरण्यासाठी एवढा आटापिटा? कारमधून आलेल्या महिलेचा कारनामा पाहून व्हाल थक्क, VIDEO

सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) रात्री उशिरा एक कार रस्त्याच्या कडेला थांबताना दिसते. कारमधून काळ्या रंगाचे कपडे घातलेली एक महिला उतरते आणि ती फुटपाथवर चालण्याचं नाटक करू लागते

नवी दिल्ली 22 नोव्हेंबर : सध्या एक हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी वेगवेगळे अंदाज लावत आहेत, की अखेर कारमधून आलेल्या चोर काकूंनी सरकारी झाडाची चोरी का केली असावी (Woman Stolen Government Tree)? दोन महिला झाडाची चोरी करताना कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. हा व्हिडिओ एका इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 70 हजारहून अधिकांनी पाहिला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) रात्री उशिरा एक कार रस्त्याच्या कडेला थांबताना दिसते. कारमधून काळ्या रंगाचे कपडे घातलेली एक महिला उतरते आणि ती फुटपाथवर चालण्याचं नाटक करू लागते. तिच्यासोबत गुलाबी रंगाची कपडे घातलेली एक महिलाही आहे, जी आपला हेतू साध्य करण्यासाठी आजूबाजूला नजर ठेवत आहे.

काळ्या रंगाचे कपडे घातलेली महिला काही वेळातच फुटपाथच्या मध्ये असलेलं एक सरकारी मालकीचं झाडं उपटताना दिसते. नंतर ती हे झाडं कारमध्ये घेऊन जाते. यानंतर कार घेऊन दोघीही तिथून फरार होतात. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्याच कैद झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by MEMES.BKS (@memes.bks)

इन्स्टाग्राम यूजर्स या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये हसण्याची इमोजी पोस्ट करत आहेत. एका यूजरनं लिहिलं, दोन्ही महिला कारमधून प्रवास करण्याचा लायकीच्या नाहीत. इतकंच नाही तर आणखी एकानं लिहिलं, की मोठे लोक. व्हिडिओच्या वरती टेक्स्टमध्ये लिहिलं आहे की सरकारी झाडही सुरक्षित नाही. ही पोस्ट MEMES.BKS नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली गेली आहे. जी सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking viral video, Theft