Home /News /viral /

आई-वडिलांची आयुष्यभराची कमाई घेऊन पळाली लेक, 1.25 कोटी रुपयांची चोरी केली पण...

आई-वडिलांची आयुष्यभराची कमाई घेऊन पळाली लेक, 1.25 कोटी रुपयांची चोरी केली पण...

एका महिलेनं तिच्या पालकांच्या क्रेडिट कार्ड आणि बँक खात्यातून तब्बल 1.25 कोटींची चोरी केली आहे.

    लंडन, 20 नोव्हेंबर : आई-वडिल मुलांना कितीही रागवत असले तरी, जास्त काळ त्यांच्यावर राग धरून ठेवू शकत नाही. असाच काहीचा प्रकार नुकताच ब्रिटनमध्ये घडला. इथं एका महिलेने तिच्या आई-वडिलांची आयुष्यभराची जमापुंजी चोरली. त्यानंतर या महिलेला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या महिलेनं आपल्याच घरातून तब्बल 1.25 कोटींची चोरी केली. दरम्यान, या महिलेनं तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर आई-वडिलांनी मात्र तिला माफ केले आहे. एसेक्समध्ये राहणारी 36 वर्षीय महिला मेलिसा फोर्डहॅमने तिच्या पालकांच्या क्रेडिट कार्ड आणि बँक खात्यातून तब्बल 1.25 कोटींची चोरी केली आहे. त्यावेळी मेलिसाचे पालक युरोप टुअरवर गेले होते. याप्रकरणी नोव्हेंबर 2017 मध्ये, मेलिसाला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मेलिसानं अनेक घोटाळे आणि चोरी केल्याचे यावेळी मान्य केले. मेलिसाच्या पालकांनी सांगितले की, तुरूंगात गेल्यानंतर त्यांची मुलगी खूप सुधारली आहे आणि त्यांनी मेलिसाला माफ केले आहे. वाचा-...आणि ती वाचली! 50 फूट खोल विहिरीत पडली हत्तीण, रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO मेलिसाचे वडील टेरेंस म्हणाले की तुरूंगात गेल्यापासून त्यांची मुलगी खूप बदलली आहे. टेरेंस म्हणाली की ती माणूस म्हणून खूप बदलली आहे. तिच्यात आता एक चांगला आत्मविश्वास आहे आणि ती पहिल्यापेक्षा आता जास्त खूश आहे. वाचा-जॅग्वारने पाण्याच्या आता अशी केली शिकार, PHOTOS पाहून व्हाल हैराण लंडनमधील एका टीचिंग कंपनीत काम करणारी मेलिसा म्हणाली की, ती आई-वडिलांचे आभार मानू इच्छिते कारण त्यांनी तिला माफ केले. मेलिसाच्या पालकांना जेव्हा ते स्पेनमधील त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हा त्यांना या फसवणूकीची माहिती मिळाली. यानंतर मेलिसाशी बोलल्यानंतर त्यांना संपूर्ण प्रकरण समजलं.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या