घाणेरडा वास सोडतो म्हणून पाळीव कुत्र्याला डॉक्टरकडे नेऊन केला खर्च; पण नवऱ्याने खुलासा केल्यावर...

घाणेरडा वास सोडतो म्हणून पाळीव कुत्र्याला डॉक्टरकडे नेऊन केला खर्च; पण नवऱ्याने खुलासा केल्यावर...

ही बाई गरोदर असताना महिनाभर अशा घाणेरड्या वासामुळे हैराण झाली होती. कुत्रा पादतो, असं वाटून ती त्याला घेऊन Vet कडेही गेली. पण अखेर नवऱ्याने खुलासा केल्यावर खरी गोष्ट समोर आली. सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होणारी स्टोरी.

  • Share this:

Viral Post : एका गर्भवती महिलेची ही स्टोरी सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ही महिला कुठली, कुठे राहते हे काहीच माहीत नाही.  पण एका प्रसिद्ध सोशल मीडिया साइटवर तिने स्वतः तिची कहाणी सांगितली आहे आणि ती पोस्ट गेल्या आठवड्यात जगभरात सर्वाधिक गाजलेली पोस्ट ठरली आहे. अतिशय विचित्र म्हणावी अशी घटना या बाईबरोबर घडली. तिने ती प्रामाणिकपणे मांडली. ती वाचल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

त्याचं झालं असं की, गेल्या महिन्यात तिला रात्री जेवत असताना अत्यंत घाणेरडा वास आला. घरात ती, तिचा नवरा आणि पाळीव कुत्रा जेरी एवढेच होते. तो वास एवढा वाईट होता की, तिची जेवणावरची वासनाच उडाली. ती चक्क दुसऱ्या खोलीत निघून गेली. पण पुढे बराच वेळ हा वास तिच्या नाकात होता. रात्री झोपताना त्या महिलेच्या नवऱ्याने आपला जेरी कुत्रा पादत असल्याचं तिला सांगितलं. दुसऱ्या दिवशीही हा वास अधून मधून येतच होता. त्या महिलेला घरात राहणं अशक्य झालं. तिने कुत्र्याच्या तब्येतीच्या काळजीने त्याला जनावरांच्या डॉक्टरांकडे (Vet) नेलं.

कुत्रा सारखा का वास सोडतो हे तपासण्यासाठी डॉक्टरांनी वेगवेगळ्या चाचण्या केल्या. त्याच्यावर औषधोपचारही सुरू झाले.  जवळपास महिनाभर ती महिला कुत्र्याला घेऊन डॉक्टरांकडे फेऱ्या मारत होती. त्यावर तिने प्रचंड खर्चही केला. vet च्या सल्ल्याने कुत्र्याचं डाएट बदललं. पण तरीही सडक्या अंड्यासारखा वास तिचा पिच्छा सोडत नव्हता. त्यात ती गर्भवती असल्याने तिला खूपच त्रास व्हायला लागला. पोटात ढवळायचं सारखं. इतका त्रास झाला की, जवळपास महिनाभर ती नैराश्यात होती.

शेवटी महिन्याभराने तिला थोडी तरतरी आली, तेव्हा नवऱ्याने एक जबरदस्त खुलासा केला. आपला कुत्रा जेरी नव्हे, मीच पादत होतो, असं त्याने पत्नीला सांगितल्यावर तिचा रागाचा पारा इतका चढला की, तिने सरळ नवऱ्याला घराबाहेर काढलं.

reddit  नावाच्या पाश्चिमात्य जगात लोकप्रिय असणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या महिलेने आपली सगळी विचित्र गोष्ट लिहिली आहे. 'कुत्रेही माणसाप्रमाणे पादतात, हे आपल्याला माहीत होतं. त्यामुळे नवऱ्याने जेरीबद्दल सांगितल्यावर मी अंधपणाने विश्वास ठेवला. हजारो डॉलर त्याच्या उपचारावर खर्च केले. माझा नवरा माझ्याशी इतकं खोटं वागल्याचं कळल्यावर कधी मला साथ न देणारी माझी सासूसुद्धा मी त्याला घराबाहेर काढून योग्य तेच केलं म्हणाली', असं तिने लिहिलं आहे.

डोकं शांत झाल्यावर तिने नवऱ्याला पुन्हा घरात घेतलं. त्यालाच डॉक्टरांकडे जाऊन पोट साफ व्हायचे औषधोपचार घ्यायला लावले. पण आता कुत्र्यावर झालेल्या खर्चाची पैन् पै नवऱ्याने त्याच्या खिशातून परत द्यावी, अशी तिची मागणी आहे. नवरा हे करायला तसा नाखुषच आहे. त्यावर तिने लोकांना त्यांचं मत विचारलं आहे. या महिलेच्या पोस्टवर अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पडला आहे. 90 टक्क्यावर लोकांनी त्या महिलेचं वागणं बरोबर असल्याचं नोंदवलं आहे. तिच्या नवऱ्याच्या आईसह सर्व मित्रांनी यात  महिलेला पाठिंबा दिला आहे.

आहे ना कमाल! सोशल मीडियाच्या या जगात कुणाची कुठली गोष्ट कुठे पोहोचेल आणि कशी लोकप्रिय होईल कुणी सांगावं?

First published: November 18, 2020, 10:00 PM IST
Tags: viral post

ताज्या बातम्या