मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कुत्र्याच्या बर्थ डेसाठी महिलेनं उडवले लाखो रुपये, लाइटिंग आणि ड्रोन शो पाहून लोक हैराण

कुत्र्याच्या बर्थ डेसाठी महिलेनं उडवले लाखो रुपये, लाइटिंग आणि ड्रोन शो पाहून लोक हैराण

एखाद्या पाळीव प्राण्यावर मालकाचं किती प्रेम असू शकतं याचा प्रत्यय नुकताच आला आहे. एका महिलेनं आपल्या पाळीव कुत्र्याच्या वाढदिवशी त्याला स्पेशल फिल देण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.

  • Published by:  News18 Desk
हुनान, 26 डिसेंबर: एखाद्या पाळीव प्राण्यावर मालकाचं किती प्रेम असू शकतं याचा प्रत्यय नुकताच आला आहे. एका महिलेनं आपल्या पाळीव कुत्र्याच्या वाढदिवशी त्याला स्पेशल फिल देण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. महिलेनं हसत हसत लाखो रुपये उडवले आहे. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर, नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. तर झालेला खर्च पाहून या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले लोकंही हैराण झाले आहेत. सध्या या कुत्र्याच्या वाढदिवसाची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित कुत्र्याचं नाव डाउ डाउ (Dau Dau) असं असून ही घटना चीनमधील हुनान प्रांतातील आहे. येथील एका महिलेला आपल्या पाळीव कुत्र्यावर एवढं जास्त प्रेम आहे की, संबंधित कुत्र्याच्या वाढदिवसासाठी या महिलेनं तब्बल 11 लाख रुपये खर्च केले आहेत. डाउ डाउचा थाटात पार पडलेला वाढदिवसाचा कार्यक्रम सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. हेही वाचा-LIVE VIDEO: काळ आला पण वेळ नाही; वादळात उडालं लोखंडी छत,ऐनवेळी कार पुढे गेली अन् पाळीव कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त संबंधित महिलेनं ड्रोन शोचं आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे या ड्रोन शोसाठी तब्बल 520 ड्रोन वापरण्यात आले होते. या ड्रोन्सचा वापर करून आकाशात ‘Dou Dou: a very happy birthday’ आणि “Wish Dou Dou a happy 10th birthday!” लिहिण्यात आलं होतं. वाढदिवस साजरा करतानाचा हा व्हिडिओ TikTok या चिनी सोशल मीडिया अॅपवर अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगानं व्हायरल झाला आहे. हेही वाचा-चष्म्याने उलगडा सर्वात मोठा 'राज', गर्लफ्रेंडसमोर चीटर बॉयफ्रेंडची पोलखोल हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकरी यावर आता भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये अनेकांनी पुढच्या जन्मी कुत्रा बनायचं असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. या कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त कुत्र्याच्या मालकाने स्वत: सांताक्लॉजचा ड्रेस तयार केला होता. या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांना देखील हा सर्व प्रकार विचित्र वाटत होता. ड्रोन भाड्याने देणाऱ्या कंपनीच्या म्हणण्यानुसार, कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त किमान 30 मिनिटांचा ड्रोन शो व्हावा, असं कुत्र्याच्या मालकीणीनं सांगितलं होत. यावेळी कुत्र्यांच्या आवाजात हॅपी बर्थडे गाणंही गायलं गेलं आहे.
First published:

Tags: China, Viral news

पुढील बातम्या