Home /News /viral /

तरुणीनं रिक्षाचालकाची केली धुलाई, भर रस्त्यात लगावली थप्पड; तरुणानं जोडले हात

तरुणीनं रिक्षाचालकाची केली धुलाई, भर रस्त्यात लगावली थप्पड; तरुणानं जोडले हात

रिक्षानं आपल्या बाईकला धडक दिल्याचा राग अनावर झाल्यामुळे तरुणीने रिक्षाचालकाच्या श्रीमुखात भडकावली. या गोंधळामुळे बराच वेळ ट्रॅफिक जॅम झालं होतं.

    भोपाळ, 7 डिसेंबर: रिक्षाची गाडीला धडक (Woman slaps auto driver) बसल्यामुळे रागावलेल्या तरुणीनं रिक्षाचालकाच्या श्रीमुखात भडकावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. रस्त्याने जात असताना एका रिक्षाचालकाने (Auto driver) दिलेल्या धडकेमुळे तरुणीच्या रागाचा पारा (angry woman) इतका चढला की तिने रस्त्यातच गाडी उभी करून रिक्षाचालकाकडे धाव घेतली. रस्त्यात जेव्हा जेव्हा किरकोळ अपघात होतात, त्यावेळी त्याच्यावरून होणारे वाद बराच वेळ चालू राहतात. अशा वेळी ट्रॅफिक जॅम होण्याच्या घटना वारंवार घडताना दिसतात. किरकोळ कारणासाठी शेकडो नागरिकांना ताटकळत राहावं लागतं (Traffic jam) आणि त्यात अनेकांचा वेळ वाया जातो. नुकत्याच समोर आलेल्या घडनेत असंच काहीसं घडलं तरुणीला रिक्षाची धडक मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये दुचाकीवरून चाललेल्या तरुणीला एका रिक्षाचा धक्का लागला. या गोष्टीवरून तरुणीला प्रचंड राग आला. रागाच्या भरात तिने रस्त्यातच आपली गाडी उभी केली आणि रिक्षाचालकाला मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ काही उपस्थितांनी रेकॉर्डही केला. या व्हिडिओत जीन्स आणि कुर्ता घातलेली तरूणी रिक्षाच्या दिशेनं जाताना आणि रिक्षाचालकाच्या श्रीमुखात लगावताना दिसते. रिक्षाचालकाने मागितली माफी रिक्षाची गाडीला धडक बसल्यानंतर रिक्षाचालकानं आपली चूक मान्य केली आणि तरूणीची माफी मागितली. मात्र तरीही तरुणीच्या रागाचा पारा निवळत नव्हता. सर्वांदेखत तिने रिक्षाचालकावरचा हल्ला सुरूच ठेवला आणि त्याच्या श्रीमुखात भडकावली. रस्त्यात ट्रॅफिक जॅम या घटनेमुळे आजूबाजूची वाहतूक ठप्प झाली. घटना घडली तेव्हा रेड सिग्नल लागला होता. काही वेळात सिग्नल ग्रीन झाला, मात्र भर रस्त्यात सुरू असलेल्या भांडणामुळे वाहनांना पुढं जाणं शक्य होईना. या घटनेमुळे शहरात अनेक तास ट्रॅफिक जॅमची परिस्थिती उद्भवली होती. हे वाचा- एका मिनिटात वेदनारहित मृत्यू! स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरणाची मशीन कायदेशीर पोलिसांत तक्रार नाही दोन्ही बाजूंकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नसल्यामुळे पोलिसांनी याबाबत अद्याप कुठलाही कारवाई केलेली नाही. मात्र या भांडणामुळे ट्रॅफिक जॅम झाल्याच्या घटनेमुळे पोलीस चौकशी करत आहेत. तरुणीने रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Police, Traffic, Woman

    पुढील बातम्या