• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • दुकानातून आणलेल्या TV चा बॉक्स उघडताच महिलेला बसला धक्का; आढळलं सडलेलं मांस

दुकानातून आणलेल्या TV चा बॉक्स उघडताच महिलेला बसला धक्का; आढळलं सडलेलं मांस

डेबरानं सांगितलं, की जेव्हापासून हा टीव्ही घरी आला तेव्हापासून पाळीव कुत्रा त्याच्या आसपासच फिरत होता आणि वास घेत होता. टीव्ही घरात येऊन एक आठवडा झाला तरीही कुत्रा असंच करत असल्यानं महिलेला संशय आला

 • Share this:
  नवी दिल्ली 31 ऑक्टोबर : नवनवीन सामान घ्यायाला सगळ्यांना आवडतं. दुकानातून एखादी नवी वस्तू खरेदी करताच तिचं पॅकिंग खोलून वापर सुरू करण्याची इच्छा होते. एका महिलेच्या बाबतीतही असंच झालं, जेव्हा तिनं दुकानातून नवा टीव्ही (New TV) खरेदी केला. मात्र, आपलं मन मारून तिनं हा टीव्ही पॅकच राहू दिला, कारण हा तिला आपल्या मुलीला ख्रिस्मसला गिफ्ट (Christmas Tree) द्यायचा होता. मात्र, महिलेच्या कुत्र्याचं वागणं पाहून हा बॉक्स खोलावा लागला. तिनं हा बॉक्स उघडताच तिला धक्का बसला (Woman Shocked after Seeing Steak in TV Box). नशीबवान! पठ्ठ्याला लागला जॅकपॉट; खरेदी केलेल्या वीसही लॉटरी एकाच वेळी जिंकला इंग्लंडच्या सोमरसेटमध्ये राहणारी 41 वर्षाची डेबरा कॉन्गँमनं सप्टेंबरमध्ये एक सॅमसंगचा टीव्ही 28 हजार रुपयात खरेदी केला. मिरर वेबसाईटच्या वृत्तानुसार, डेबरानं सांगितलं, की सॅमसंगच्या शोरूममधून खरेदी करताच तिनं हा टीव्ही थेट घरी आणला. तिनं असं ठरवलं होतं, की हा टीव्ही ती आपल्या मुलीला गिफ्ट करेल. त्यामुळे तिनं पॅकिंग न खोलताच हा टीव्ही ख्रिस्मससाठी ठेवला. बॉक्स खोलून हा टीव्ही पाहण्याची तिची भरपूर इच्छा होती. मात्र, हा टीव्ही तिला आपल्या मुलीला गिफ्ट द्यायचा असल्यानं तिनं असं केलं नाही. डेबरानं सांगितलं, की जेव्हापासून हा टीव्ही घरी आला तेव्हापासून पाळीव कुत्रा त्याच्या आसपासच फिरत होता आणि वास घेत होता. टीव्ही घरात येऊन एक आठवडा झाला तरीही कुत्रा असंच करत असल्यानं महिलेनं हा बॉक्स खोलण्याचा निर्णय घेतला. तिनं टीव्हीचा बॉक्स उघडताच त्यातून दुर्गंधी येऊ लागली. टीव्हीच्या शेजारीच बॉक्समध्ये एक पॅकेट ठेवलेलं असल्याचं तिला दिसलं, हे पॅकेट पाहताच महिलेला धक्का बसला. ऑनलाइन क्लासमध्ये शिक्षकाचा नको तो प्रताप; 'त्या' अवस्थेत पाहून विद्यार्थीही शॉक या पॅकेटमध्ये स्टीक म्हणजेच बीफच्या मांसाचा तुकडा पॅक करून ठेवण्यात आलेला होता (Steak found in TV box). महिलेनं सांगितलं, की हे पाहताच तिला उल्टी येऊ लागली कारण हे मांस सडलेलं होतं. महिलेनं म्हटलं की तिचं कुटुंब या पाळीव कृत्याचं आभारी आहे. कारण त्यानं आपल्या वास घेण्याच्या क्षमतेनं यातील मांस शोधून काढलं. डेबरानं जेव्हा ही बाब सॅमसंगमध्ये सांगितली, तेव्हा त्यांनी टीव्ही बदलून दिला आणि पुढच्या वेळी शॉपिंग करताना तीन हजार रुपयांची सूट देण्याचं आश्वासन तिला दिलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: