नवी दिल्ली 14 जानेवारी : तुमची नखं स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही मॅनिक्युअर केलं आणि ते तुमच्यासाठी घातक ठरलं तर? असा विचारही आपण कधी करत नसेल. मात्र, मॅनिक्युअरसाठी गेलेल्या एका महिलेसोबत असंच काहीसं घडलं. तिच्या नखांमध्ये घातक कॅन्सर विकसित झाला. अमेरिकेत राहणारी ग्रेस गार्सिया मॅनिक्युअरसाठी गेली होती, जिथे तिच्या नखांना एका टूलच्या मदतीने योग्य आकार देण्यात आला. नंतर त्याठिकाणी फोड येत असल्याचं महिलेच्या लक्षात आलं.
बॉडी व्हॅक्स आणि फेस व्हॅक्स असतात खूप वेगळे, एका चुकीमुळेही चेहरा होऊ शकतो खराब
तपासणी केली असता महिलेला समजलं, की तिला त्वचेचा कॅन्सर झाला आहे. मॅनिक्युअर केल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की तिच्या बोटाला जखम झाली होती आणि नखं सुरू होतात तिथल्या पातळ त्वचेच्या वर्तुळावर एक फोड तयार झाला होता. जेव्हा महिलेच्या उजव्या बोटावरचा हा फोड तीन महिने पूर्ण बरा झाला नाही, तेव्हा तिला काहीतरी गडबड झाल्याचं जाणवलं.
यानंतर ती त्वचारोगतज्ज्ञांकडे पोहोचली. जिथे डॉक्टरांनी तिला बायोप्सी करण्याचा सल्ला दिला. यात गार्सियाला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा म्हणजेच त्वचेच्या कर्करोगाचा नॉन-मेलेनोमा प्रकार असल्याचं निदान झालं.
गार्सियावर डॉ. टिओ सोलेमानी यांनी उपचार केले होते. त्यांनी हे उघड केले की कर्करोग ह्युमन पॅपिलोमाव्हायरसमुळे (HPV) होतो आणि मॅनिक्युअरमुळे कर्करोग विकसित झाला असावा. एचपीव्हीमुळे नखांचा कर्करोग दुर्मिळ असला तरी आता त्याची प्रकरणं वाढत आहेत, असंही या तज्ज्ञाने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cancer, Shocking news, Viral news