मराठी बातम्या /बातम्या /Viral /ब्रेकअपनंतरही एक्स बॉयफ्रेंडला मेसेज करणं पडलं महागात, कोर्टाने तरुणीला सुनावली ही शिक्षा

ब्रेकअपनंतरही एक्स बॉयफ्रेंडला मेसेज करणं पडलं महागात, कोर्टाने तरुणीला सुनावली ही शिक्षा

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

मिशेल फेल्टन नावाच्या मुलीने ब्रेकअप झाल्यानंतर तिचा माजी प्रियकर रायन हर्लीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण मिशेलच्या प्रेमाचं रुपांतर जिद्दीत झालं आणि ती दिवसाला १००-१५० मेसेज करून रायनला रिलेशनशिप न तोडण्याची विनंती करायची

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 20 जानेवारी : जेव्हा मुलगा आणि मुलगी रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा त्यांना एकमेकांबद्दलची प्रत्येक गोष्ट आवडते. त्यांना एकमेकांची कंपनी इतकी आवडते की त्यांना दिवसभर एकत्र राहायचं असतं. मात्र, हे नातं काही कारणाने तुटलं तर कधी-कधी दोघांनाही मोठा धक्का बसतो. एका मुलीसोबतही असंच घडलं आणि ब्रेकअपचं दुःख सहन न झाल्यानं तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही.

प्रियकराने तिच्यासोबतचं नातं तोडलं तेव्हा हा धक्का तिला सहन झाला नाही. ती त्याला दिवसातून 100-150 वेळा कॉल आणि मेसेज पाठवायची, पण तिला एकही रिप्लाय मिळत नव्हता. मुलाचं नाव रायन आणि मुलीचं नाव मिशेल आहे. त्यांच्यात भांडण झाल्यानंतर अशी परिस्थिती आली की रायनने मिशेलसोबत ब्रेकअप केलं. मात्र, त्यानंतर खऱ्या अर्थाने नाट्य सुरू झालं.

तरुणाने मृत्यूच्या दारात असलेल्या प्रेयसीसोबत रुग्णालयातच केलं लग्न, कारण वाचून पाणावतील डोळे

मिशेल फेल्टन नावाच्या मुलीने ब्रेकअप झाल्यानंतर तिचा माजी प्रियकर रायन हर्लीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण मिशेलच्या प्रेमाचं रुपांतर जिद्दीत झालं आणि ती दिवसाला १००-१५० मेसेज करून रायनला रिलेशनशिप न तोडण्याची विनंती करायची. ती त्याला विचारत राहिली की ब्रेकअप का झालं? तो तिच्याशी का बोलत नाही किंवा ते पुन्हा कधी भेटतील? जेव्हा तिला रायनकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा तिने तिच्या माजी प्रियकरावर ड्रायव्हिंग टेस्टमध्ये फसवणूक केल्याचा आरोप केला.

यानंतरही एक्स बॉयफ्रेंड तिच्यासोबत बोलला नाहीच पण प्रकरण कोर्टात नक्कीच पोहोचलं. घराबाहेर गिफ्ट मिळू लागल्यावर मिशेलच्या एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांची मदत घेतली. त्याने मिशेलवर त्यांच्या 21 महिन्यांच्या नात्यात कंट्रोलिंग केल्याचा आरोप केला. त्यांचं नातं मे 2020 मध्ये सुरू झालं आणि फेब्रुवारी 2022 मध्ये ब्रेकअप झालं. एका भांडणादरम्यान मिशेलचं बोट रायनकडून तुटलं आणि त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं.

6 महिन्यांपूर्वी जोडप्याचा झालेला भयावह शेवट; आता घरच्यांनी दोघांचे पुतळे बनवून लावलं लग्न

15 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान मिशेलने त्याला 1000 मेसेज आणि कॉल केले. यामध्ये कोणतीही धमकी नव्हती, पण रायन कंटाळला होता आणि तो आत्महत्येचा विचार करू लागला. केस कोर्टात गेल्यानंतर मिशेलने तिची चूक मान्य केली आणि न्यायाधीशांनी तिला 18 महिने रायनपासून दूर राहण्यास सांगितलं. याशिवाय रायनला 5000 आणि 39000 चा दंड भरण्यासही सांगितलं आहे.

First published:

Tags: Girlfriend, Viral news