जगभरात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक भागात पुरजन्य परिस्थिती उद्भवली आहे. सध्या सोशल मीडियावर पावसासंदर्भातील अनेक व्हिडीओ समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मगरीच्या तोंडात महिलेचा मृतदेह असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरुन हा उत्तर प्रदेशातील जालोनमधील असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान या व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती समोर आली आहे.
हा व्हि़डीओ भारतातील नसून मेक्सिकोमधील असल्याचं सांगितलं जात आहे. Altnews ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका मगरीच्या तोंडात महिलाचा मृतदेह असल्याचं दिसून येत आहे. काही वेळानंतर मगर खोल पाण्यात निघून जाते. हा व्हिडीओ गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा-सासूशी पंगा घेणं पडलं महागात; भररस्त्यात जावयाची चपलेने धुलाई, Video Viral
हा व्हिडीओ भारतातील नसून News18 लोकमत देखील या व्हायरल व्हिडीओची पुष्टी करीत नाही.
काय आहे महाराष्ट्राची परिस्थितीआज मुंबई, पुण्यासह विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. आज नागपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला अशा एकूण 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. वरील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. पण आकाशात विजा चमकण्याचं प्रमाण अधिक असू शकतं.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.