मुंबई 05 डिसेंबर : जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला कळेल की तुम्हाला कन्फर्म सीटसाठी आधीच तिकीट बुक करावं लागतं. अन्यथा, जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल तर तुम्हाला बसण्यासाठी किंवा झोपायला जागा मिळत नाही. तरीही लोक कसेतरी जुगाड करून घेत प्रवास करतात. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून या मोसमात प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणं कठीण झालं आहे. अशात अनेकदा त्यांना वेटिंग तिकिटावरच प्रवास करावा लागतो. सोशल मीडियावर सध्या असाच ट्रेन आणि जागेसंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अधिकाऱ्यांनी कोरोना रुग्णाला पायाला धरून ओढत नेलं; Viral Video मुळे उडाली खळबळ
हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले. कारण यात जे दृश्य पाहायला मिळतं, ते सहसा दिसत नाही. या घटनेत एका महिलेला ट्रेनमध्ये बसण्यासाठी जागा मिळाली नाही. अशात तिने ट्रेनचा सेंसर असलेला दरवाजाच बंद होण्यापासून रोखला, कारण ती दरवाजातच उभा राहिली. महिलेनं भरपूर गोंधळही घातला. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांनी या महिलेला ट्रेन ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसवलं.
ट्रेन में सीट नहीं मिलने पर औरत को ड्राइवर के बगल में ही बैठा दिया 😁❤️ pic.twitter.com/GnoYhv9pPb
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) December 3, 2022
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक ट्रेन प्लेटफॉर्मवर उभा आहे. ट्रेनच्या दरवाजाजवळ अनेक लोक उभा आहेत. यात काही पोलीस कर्मचारी आणि रेल्वे कर्मचारीही आहेत. हे सर्वजण एका महिलेला ट्रेनमधून खाली उतरण्यास सांगत आहेत. मात्र, ही महिला खाली उतरायला तयार होत नाही. ती दरवाजातच उभा राहते, अशात दरवाजा बंदच होत नाही.
अखेर रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांनी मिळून महिलेला या डब्यातून खाली उतरवलं आणि तिला ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसवलं. यानंतर ही ट्रेन पुढे सरकली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. @Gulzar_sahab नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की ट्रेनमध्येसीट न मिळाल्याने महिलेला ड्रायव्हरच्या शेजारी बसवलं गेलं.
वडिलांसमोरच मगरीने एका वर्षाच्या चिमुकल्याला जिवंत गिळलं; अंगावर काटा आणणारा VIDEO
यावर अनेकांनी निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, ‘यही भारत की नारी शक्ति है’. आणखी एकाने लिहिलं की मुलगी असण्याचे हेच फायदे आहेत. यासोबतच एकाने लिहिलं, की या महिलेच्या जागी एखादा पुरुष असता तर त्याच्यावरती अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Train, Viral videos