Home /News /viral /

Beauty Parlour मध्ये महिलेसोबत भयंकर दुर्घटना; Viral होतोय Video

Beauty Parlour मध्ये महिलेसोबत भयंकर दुर्घटना; Viral होतोय Video

महिला ब्युटी पार्लरमध्ये घाईघाईत धाव आली. पण तिच्यासोबत असं काही घडलं की ती मोठमोठ्याने ओरडू लागली.

मुंबई, 07 मे : 'अति घाई संकटात जाई' असं म्हटलं जातं. बरेचदा आपल्याला एखादं काम लवकर करायचं असतं; पण नेमका त्याला उशीर होतो किंवा घाईत (Hurry) कुठेतरी पोहोचायचं असतं; पण काहीतरी वेगळंच घडतं आणि आपण वेळेत पोहोचू शकत नाही. एखाद्या वेळी लवकर पोहोचण्यासाठी आपण वेगाने चालत असतो अन् त्यातच अडखळतो किंवा लक्ष नसल्यासं कुठेतरी आदळतो. तुमच्यासोबतही असे प्रकार बऱ्याचदा घडले असतील. असंच काहीसं एका तरुणीसोबत घडलंय आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral On Social Media) झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी ब्युटी पार्लरकडे (Beauty Parlor) वेगाने धावत येताना दिसत आहे. घाईगडबडीमध्ये तिला समोर पार्लरचा पारदर्शक काचेचा दरवाजा (Transparent Glass Door) असल्याचं लक्षात येत नाही आणि ती सरळ त्याला जाऊन धडकते. यामुळे दरवाजा तुटून पार्लरच्या आतील बाजूला पडतो. त्या मुलीच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याचं व्हिडिओत दिसतं. दरवाजा पारदर्शक असल्यामुळे तो उघडा असल्याचं समजून मुलगी आत येण्याचा प्रयत्न करते आणि ही दुर्घटना (Accident) घडते. ही संपूर्ण घटना पार्लरमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कॅप्चर झाली आहे. हे वाचा - अजबच! फक्त 180 रुपयांच्या चप्पल चोरीमुळे पोलीसही चिंतेत; तक्रार येताच सुरू केला तपास कारण... ही घटना घडली तेव्हा सुदैवाने पार्लरमध्ये दुसरं कोणी नव्हतं. त्यामुळे पार्लरचा दरवाजा आत पडल्याने मोठं नुकसान झालं नाही आणि कोणाला दुखापत झाली नाही.
View this post on Instagram

A post shared by ViralHog (@viralhog)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल हॉग (Viralhog) या इन्स्टाग्राम अकाउंटवरून (Vietnamese Instagram Account) हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी त्यावर लाईक्स (Likes) आणि कमेंट्सचा (Comments) पाऊस पाडला आहे. या व्हिडिओवर लोकांनी मिक्स रिअॅक्शन दिल्या आहेत. काहींनी या घटनेला वेदनादायक म्हटलं आहे, तर काही लोक या मुलीला ट्रोलदेखील (Troll) करत आहेत. हे वाचा - अनोळखी व्यक्तीने खरेदी केली अ‍ॅडल्ट मॉडेलच्या पायाची नखं; बदल्यात दिलेली रक्कम पाहून थक्क झाली तरुणी त्यामुळे तुम्हीही धावत जाताना किंवा वेगाने चालत जाताना समोर लक्ष देत जा, अन्यथा या व्हिडीओतील मुलीप्रमाणे अपघात होऊन दुखापत होऊ शकते. त्यासाठी आणखीही एक गोष्ट करता येईल ती म्हणजे वेळेवर निघून वेळेवर हवं त्या ठिकाणी पोहोचायचं.
First published:

Tags: Viral, Viral videos

पुढील बातम्या