मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! भल्यामोठ्या ट्रकनं उडवलं पण तिच्या केसालाही धक्का लागला नाही; VIDEO पाहून व्हाल थक्क

OMG! भल्यामोठ्या ट्रकनं उडवलं पण तिच्या केसालाही धक्का लागला नाही; VIDEO पाहून व्हाल थक्क

अपघाताचा हा व्हिडीओ (accident video) पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्याच डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.

अपघाताचा हा व्हिडीओ (accident video) पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्याच डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.

अपघाताचा हा व्हिडीओ (accident video) पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्याच डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.

    चेन्नई, 07 डिसेंबर : भल्यामोठ्या ट्रकनं (truck) धडक देऊन त्या व्यक्तीच्या अंगावरून ट्रक गेल्यानंतर त्याची काय अवस्था होईल, या विचारानंच काळजात धडकी भरते. त्या व्यक्तीच्या शरीराचं काय होईल, याची कल्पनाही सहन होत नाही. मात्र असाच अपघात होऊनही एखाद्या व्यक्तीच्या साध्या केसालाही धक्का लागला नाही असं सांगितलं, तर साहजिकच कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर (social media) असाच एक व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे. एका ट्रकनं एका वृद्ध महिलेला उडवलं, ती महिला ट्रकच्या खाली गेली, तिच्यावरून तो ट्रक गेला पण तिला साधी जखमही झाली आहे. नशीब बलवत्तर म्हणून ही महिला वाचली. CGTN ने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. CGTN च्या रिपोर्टनुसार ड्रायव्हर जेव्हा वळण घेत होता त्यावेळी त्याला वृद्ध महिला दिसली नाही आणि हा अपघात झाला. हे वाचा - VIDEO : भीषण अपघातात गर्भवती महिलेचं पोट फुटलं अन् जिवंत बाहेर आलं अर्भक रिपोर्टनुसार ही घटना तामिळनाडूच्या तिरुचेंगोडेतील आहे. ही महिला बस स्टॉपच्या दिशेनं जात होती. त्यावेळी एक पिवळ्या रंगाचा ट्रक तिच्या दिशेनं आला आणि काही क्षणातच त्यानं महिलेला उडवलं. तिच्यावरून हा ट्रक गेला. व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटेल की महिलेचा जीव गेलाच मात्र ट्रक गेल्यानंतर महिलेला जिवंत पाहून सर्वांना शॉकच बसला. महिला अगदी ठणठणीत होती. तिला किंचितशीही जखम झाली नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Social media viral, Viral, Viral videos

    पुढील बातम्या