Home /News /viral /

'नवरा भाड्याने देणं आहे', बायकोने सोशल मीडियावर दिली जाहिरात; कारणही आहे शॉकिंग

'नवरा भाड्याने देणं आहे', बायकोने सोशल मीडियावर दिली जाहिरात; कारणही आहे शॉकिंग

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

एका महिलेने आपला नवरा इतरांसाठी भाड्याने उपलब्ध असल्याची जाहिरात सोशल मीडियावर दिली आहे.

    लंडन, 29 जून :  घर, गाडी, एखादी वस्तू भाड्याने देतात हे तुम्हाला माहिती आहे. पण कधी कुणी आपल्या नवऱ्याला भाड्याने दिल्याचं ऐकलं आहे का? खरंतर बॉयफ्रेंड असो वा नवरा, कोणत्या महिलेला आपला लाइफ पार्टनर दुसऱ्या कुणासोबत शेअर करायला आवडत नाही. पण एका महिलेने मात्र चक्क आपल्या नवऱ्याला भाड्याने देण्याची सर्व्हिस सुरू केली आहे (Woman Renting Husband). तिने सोशल मीडियावर याची जाहिरात दिली आहे. यूकेतील लॉरा यंग, जी तीन मुलांची आई आहे. तिने आपला पती जेम्सला भाड्याने देण्याची सर्व्हिस ऑफर केली आहे. जेम्स याआधी वेअरहाऊसमध्ये काम करायचा. दोन वर्षांपूर्वी त्याने ती नोकरी सोडली. पण त्याच्यातील अनोख्या टॅलेंडमुळे आता त्याच्या बायकोने त्याला रेंटवर द्यायला सुरुवात केली आहे. आता या महिलेनेला आपला नवरा भाड्याने नेमका का आणि कशासाठी द्यायचा आहे हे जाणून घेण्याची उत्सुकताही तुम्हाला असेल. हे वाचा - VIDEO - भावाने बहिणीला दिलं असं Wedding Gift; पाहताच नवरीबाईसह पाहुण्यांनाही रडू कोसळलं मिररच्या रिपोर्टनुसार जेम्सला आपल्या हातांनी जोडायला-तोडायला खूप आवडतं. आपल्या या हौशमुळे तो DIY वस्तूंचा मास्टर आहे. आपल्या जुन्या घरालाही त्याने आपल्या या कौशल्यामुळे सुंदर आणि अनोखं बनवलं आहे. पाणी-विजेपासून ते फर्निचरपर्यंत प्रत्येक काम त्याला योग्यपद्धतीने करता येतं.  पतीच्या या कलेला महिलेला आपल्या अतिरिक्त उत्पन्नाचा साधन बनवायचं आहे. त्यामुळे पतीला अशा कामांसाठी रेंट करण्याची सर्व्हिस तिने ऑफर केली आहे (British Woman Rents Husband for DIY). लॉरा सांगते, तिचा नवरा बाग, घर यासाठी अनोख्या वस्तू बनवू शकतो. त्याच्या या स्किलसाठी लोक त्याला भाड्याने घेऊन शकता. लॉराने आपल्या या अनोख्या बिझनेससाठी Rent My Handy Husband नावाची वेबसाईट तयार केली आहे आणि फेसबुकवर याची जाहिरातही दिली आहे. हे वाचा - Shocking! किडनी स्टोनवर उपचारासाठी रुग्णालयात गेली तरुणी आणि अचानक जन्माला आलं बाळ वाढत्या महागाईत घराचं बजेट सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत. अशावेळी लोक अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत शोधतात. वेगवेगळ्या मार्गाने जास्तीत जास्त पैसे जमवण्याचा प्रयत्न करतात. अशाच जादा पैशांसाठी या महिलेने आपल्या नवऱ्यालाच भाड्याने दिलं आहे. तुम्हाला महिलेची ही विचित्र बिझनेस आयडिया कशी वाटली ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Relationship, Viral, Viral post, Wife and husband

    पुढील बातम्या