Home /News /viral /

फूलं घेऊन मृत पतीला भेटायला पोहोचली महिला; Graveyard वरच उभी केली कार!

फूलं घेऊन मृत पतीला भेटायला पोहोचली महिला; Graveyard वरच उभी केली कार!

हा फोटो पाहून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

    नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : स्मशानभूमी ही एक अशी जागा आहे, जेथे लोकांच्या निधनानंतर त्यांचं दहन केलं जातं. प्रत्येकाच्या धर्मानुसार व्यक्तीचं दफन किंवा दहन केलं जातं. काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया (Social Media) साइट फेसबुकवर एका कब्रिस्तानचे काही फोटो समोर आले होते. या फोटोंमुळे बराच वाद सुरू झाला. या फोटोंमध्ये कब्रिस्तानच्या वर एक कार पार्क (Car Parked On Graveyard) केली आहे. हा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. व्हायरल होणारा फोटो मलेशियाचा आहे. हा फोटो 17 फेब्रुवारी रोजी फेसबुकवर अपलोड करण्यात आला होता. स्मशानभूमीत (कब्रिस्तान) कोणी कसं काय कार घेऊन येऊ शकतं, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मलेशियायी मीडिया Utusan च्या वृत्तानुसार, कब्रिस्तानमधील ही कार एका वयस्क महिलेची होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार 60 वर्षीय एक महिला चालवत होती. ती स्मशानभूमीत आपल्या पतीच्या कब्रिवर फूल अर्पण करायला आली होती. यादरम्यान अचानक तिच्या शरीरातून साखरेचं प्रमाण कमी झालं. ज्यात ती बेशुद्ध पडली. बेशुद्धीच्या अवस्थेत तिने ऑइल पॅडलवर प्रेशर दिला आणि कार अनेक थडगींच नुकसान झालं. हे ही वाचा-स्वत:च्या 6 महिन्याच्या मुलीला कुत्र्याप्रमाणे कच्च मांस खाऊ घालते ही आई! या अपघातातच दोन थडग्यांचं नुकसान झालं असून कारचंही बरंच नुकसान झालं आहे. सुदैवाने कारमध्ये बसलेल्या महिलेला फार दुखापत झाली नाही. पोलिसांनी पुढे सांगितलं की, महिलेच्या मुलाने या प्रकरणात एक रिपोर्ट दाखल केली असून स्मशानभूमीच्या डागडुजीचा सर्व खर्च तो करेल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Photo viral, Social media

    पुढील बातम्या