मेक्सिको सिटी, 08 नोव्हेंबर : तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुमची ठरलेल्या वेळेची ट्रेन सुटली किंवा बस स्टॉपवर धावत गेलात आणि त्याच वेळी बस निघाली तर तुम्हाला खूप राग येतो. पण अशावेळी तुम्ही काहीच करू शकत नाही. त्या रागाला आवरता. अशीच एका महिलेची फ्लाइट मिस झाली. त्यानंतर मात्र तिचा राग अनावर झाला. ती इतकी संतप्त झाली की आऊट ऑफ कंट्रोल झाली आणि तिने विमानतळावरच धक्कादायक कृत्य केलं. तिचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
फ्लाइट मिस झाली म्हणून एका महिलेने विमानतळावर हाय वोल्टेज ड्रामा केला आहे. मेक्सिकोतील ही घटना आहे. महिला एअरपोर्टवर उशिराने पोहोचली. ज्यामुळे तिची फ्लाइट मिस झाली. त्यानंतर तिला राग आला. ती इतकी संतप्त झाली की तिने विमानतळावरच राडा घातला.
महिलेने विमानतळावरील कर्मचाऱ्यांवर आपला राग काढला. अमिरात एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्सवर ती ओरडू लागली. चेक इन स्टाफवर तिने हल्ला केला. कर्मचाऱ्यांना तिने मारहाण केली इतर प्रवाशांवरही तिने पाण्याच्या बाटल्या फेकल्या. खुर्च्यांची तोडफोड केली. हाताला मिळेल त्या वस्तूंची तिने वाट लावली.
हे वाचा - VIDEO - बापरे! हा असा कसला परिणाम; प्लेन उडताच काही क्षणात अचानक म्हातारी झाली महिला
ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने यात कर्मचाऱ्यांची काही चूक आहे का, असा सवालही उपस्थित केला आहे.
Moment woman throws punches at Emirates airline employee and hurls objects at bystanders after missing her flight at #MexicoCity airport pic.twitter.com/sHsPEKkWzl
— Hans Solo (@thandojo) November 7, 2022
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane, Airport, Viral, Viral videos