मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! सलग 12 वर्षे प्रेग्नंट राहिली ही महिला; VIDEO पाहून चक्रावून जाल

OMG! सलग 12 वर्षे प्रेग्नंट राहिली ही महिला; VIDEO पाहून चक्रावून जाल

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

एका महिलेने आपल्या प्रेग्नन्सीबाबत आपल्या सोशल मीडियावर खुलासा केला आहे.

  मुंबई, 03 जून : प्रेग्नंट होणं हा क्षण कोणत्याही महिलेसाठी जितका आनंदाचा तितकाच त्रासदायकही असतो. प्रेग्नन्सीच्या कालावधीत महिलांना बऱ्याच शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. 9 महिन्यांच्या या कालावधीत आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी उद्धवतात. त्यामुळे एकदा डिलीव्हरी झाली की काही महिलांना तर पुन्हा प्रेग्नन्सी नकोशीच वाटते. असं असताना एका महिलेने मात्र सर्वांनाच धक्का दिला आहे. सलग 12 वर्षे ही महिला प्रेग्नंट राहिली (Woman pregnant for 12 years). एका महिलेने आपल्या प्रेग्नन्सीबाबत आपल्या सोशल मीडियावर खुलासा केला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत सुरुवातीला एक महिला दिसेल. व्हिडीओत 'ज्या वर्षात मी प्रेग्नंट राहिली' असं कॅप्शन दिलेलं आहे. त्यानंतर तिच्यासमोर एक तरुण येतो. हा तरुण तिचाच मुलगा आहे. जसा तरुण व्हिडीओसमोर येतो. तसं व्हिडीओत 2000-2001 असं दिसतं. त्यानंतर तरुणामागून एक मुलगी येते, तेव्हा व्हिडीओवर 2001-2002 असं लिहिलेलं असतं. म्हणजे 2000-2001 या वर्षात प्रेग्नंट होती, तेव्हा या मुलाचा नज्म झाला. तर 2001-2002 साली प्रेग्नंट असताना तिने एका मुलीला जन्म दिला. हे वाचा - OMG! हे कसं शक्य आहे? महिलेचा चमत्कारिक Pregnancy Video पाहून चक्रावले नेटिझन्स त्यानंतर व्हिडीओत ती पुढे एकामागोमाग एक आपल्या प्रेग्नन्सीचं वर्ष सांगते आणि त्या वर्षाला जन्मलेल्या मुलांची ओळख करून देते. असं करत ती 2012 वर्षापर्यंत पोहोचते. सलग 12 वर्षे ती प्रेग्नंट राहिली. या कालावधीत तिने तब्बल 8 मुलांना जन्म दिला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Ms Kora 🇮🇳 (@mzkora)

  व्हिडीओच्या शेवटी प्रेग्नंट नसल्याचं वर्ष ती झिरो सांगते. म्हणजे 2001 ते 2012 यामध्ये असं एकही वर्ष असं नाही ज्या वर्षात ती प्रेग्नंट नव्हती. आपल्या प्रेग्नन्सीचं वर्ष आणि मुलांना भेटवताना महिलेलाही हसू आवरत नाही. ती या व्हिडीओत हसताना दिसते. हे वाचा - गंभीर आजारानंतरही बाप बनवण्याची हौस! 15 मुलं जन्माला घातली आणि आता... mzkora इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने तिला सुपरमॉम म्हटलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Lifestyle, Viral, Viral videos

  पुढील बातम्या