Home /News /viral /

महिलेनं ऑनलाईन ऑर्डर केली सुंदर खुर्ची; घरी डिलिव्हर झालेलं सामान पाहून झाली शॉक

महिलेनं ऑनलाईन ऑर्डर केली सुंदर खुर्ची; घरी डिलिव्हर झालेलं सामान पाहून झाली शॉक

Shocking news: मरियम एकदा एका वेबसाईटवर सामान बघत होती. तेव्हाच तिची नजर एका अतिशय सुंदर खुर्चीवर पडली, याला वेलवेट लावलेलं होतं. ही खुर्ची पाहताच तिला ती खरेदी करण्याची इच्छा झाली.

    नवी दिल्ली 01 फेब्रुवारी: ऑनलाईन शॉपिंगमध्ये अनेकदा कंपनीकडून चुकीचं सामान डिलिव्हर केलं जातं. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या 10 पैकी 6 लोकांना हा अनुभव येतो, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अनेकदा लोक याबाबत तक्रार करत असतात की ऑनलाईन शॉपिंगमध्ये (Online Shopping) त्यांना ते सामान मिळालं नाही, जे त्यांनी ऑर्डर केलं. नुकतंच असंच काहीसं अमेरिकेतील एका महिलेसोबत घडलं. या महिलेनं खुर्ची ऑर्डर केली होती (Woman Ordered a Chair Online). तिला खुर्ची तर मिळाली मात्र त्याची साईज अगदी वेगळीच होती. ऐकावं ते नवल! सोशल मीडियावर बटाट्याबाबत कमेंटमुळे वांदा; महिलेला FB ने केलं बॅन मिरर वेबसाईटच्या वृत्तानुसार, मरियम नावाच्या एका महिलेनं टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर करत सांगितलं, की तिला कशाप्रकारे ऑनलाईन शॉपिंगचा वाईट अनुभव आला. मरियम एकदा एका वेबसाईटवर सामान बघत होती. तेव्हाच तिची नजर एका अतिशय सुंदर खुर्चीवर पडली, याला वेलवेट लावलेलं होतं. ही खुर्ची पाहताच तिला ती खरेदी करण्याची इच्छा झाली. तिने ही खुर्ची ऑर्डर केली. मात्र, ऑर्डर डिलिव्हर होताच मरियमला धक्का बसला. व्हिडिओमध्ये मरियमने दाखवलं की ही खुर्ची खेळण्यातील होती आणि तिची साईज केवळ एका हाताएवढी होती. मरियमने हे दाखवत सांगितलं की यामुळेच ती ऑनलाईन शॉपिंगवर विश्वास ठेवत नाही, कारण तिला या सामानवर कधीच विश्वास बसत नाही. तिने लोकांना सल्लाही दिला की सामान खरेदी करताना ते परत करता येईल का, हे पाहून खरेदी करा. 'या' महिलेच्या डोळ्यांत आहे जादू; अद्भुत डोळे ओळखतात दहा कोटी रंग; कसे ते वाचा हा व्हिडिओ पाहून लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सवाल उपस्थित केला की यासाठी महिलेनं किती पैसे खर्च केले होते आणि तिचे पैसे तिला परत मिळाले का? तर दुसऱ्या एका व्यक्तीने कमेंट करत म्हटलं की याच कारणामुळे मला ऑनलाईन शॉपिंगवर विश्वास नाही. आणखी एकाने कमेंट करत म्हटलं की मोठी खुर्ची आणि खेळण्यातील खुर्ची याच्या किमतीत बराच फरक असेल. त्यामुळे महिलेला किंमत पाहूनच याचा अंदाज यायला हवा होता.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Online, Online fraud, Online payments, Online shopping, Viral news, Woman

    पुढील बातम्या