‘या श्वानाला शोधा आणि मिळवा 5 लाख!’ तरुणीनं शहरभर लावले बॅनर

‘या श्वानाला शोधा आणि मिळवा 5 लाख!’ तरुणीनं शहरभर लावले बॅनर

तुम्ही शोधलं तर तुम्हाला 5 लाख पण या तरुणीनं स्वत: श्वानाला शोधण्यासाठी भाड्यानं घेतलं 1,200चं विमान

  • Share this:

सॅन फ्रान्सिस्को, 20 डिसेंबर : पाळीव प्राण्यांना जीव लावणारी मंडळी आपण पाहिली असतील. यात श्वान आणि मांजरींवरच्या प्रेमापायी लोक कोणत्या स्थराला जातील याचा काय नेम नाही. असाच प्रकार सॅन फ्रान्सिस्कोमध्ये घडला आहे. एका तरुणीनं चक्क आपल्या चोरीला गेलेल्या श्वानाला शोधण्यासाठी बक्षिस म्हणून 5 लाखांची रक्कम ठेवली आहे.

एका इंग्रजी वृत्तापत्रानं दिलेल्या माहितीनुसार शनिवार (15 डिसेंबर) रोजी या तरुणीचा 5 वर्षांचा ऑस्ट्रेलियन शेफर्ड हा श्वान किराणा दुकानाच्या बाहेर चोरीला गेला होता. त्यामुळं त्याला शोधण्यासाठी ही तरुणी सध्या जवळच्या परिस्थितीत रोज फेरफटका मारत आहे. त्यामुळं कंटाळून तिनं वृत्तपत्रांमध्ये या श्वानाला शोधणाऱ्यासाठी पाच लाखांचे बक्षिस रक्कम म्हणून ठेवली आहे.

एवढेच नाही तर जॅक्सन या श्वानाचा शोध घेण्यासाठी चक्क 1200 डॉलर (85 हजार 335) रुपयांचे विमान भाड्याने घेतले आहे. तर, या श्वानाला शोधण्यासाठी वेबसाईटही तयार केली आहे. एमिली टेलरमो असे या तरुणीचे नाव असून ती स्वत: रोज विमानातून आपल्या श्वानाचा शोध घेत आहे.

वाचा-दोन्ही पायाने अपंग असूनही अख्खा देशाचा पोशिंदा झाला, वाचा तरुणाची Success स्टोरी

वाचा-Year Ender 2019: बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले टॉप 5 कपल्स

एमिलीनं एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत, “5 वर्षांचा श्वान शोधण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मी इकडे एकटी आहे, त्यामुळं या श्वानाला शोधण्यासाठी मदत हवी आहे”, असे आवाहनही केले आहे.

वाचा-विकेट घेतल्यानंतर गोलंदाजानं मैदानातच केला अजब स्टंट, पाहा सेलिब्रेशनचा VIDEO

वाचा-आता कार्ड किंवा पैसे न देता करा शॉपिंग, SBI ची ही खास सेवा

दरम्यान या श्वानाची ज्या ठिकाणाहून चोरी झाली तेथील सर्व सीसीटिव्ही कॅमेराचे फुटेज तपासण्यात आले आहे. एमिलीनं शहरभर जॅक्सनच्या फोटोचे बॅनर लावले आहेत. यासाठी www.bringjacksonhome.com वेबसाइट तयार केली, जिथे या श्वानाला शोधण्यासाठी 5 लाखांची बक्षिस रक्कम देण्यात येणार आहे. फेसबुक, ट्विटरवर, टिंडर आणि लिंकडिनवर जाहिरात करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2019 05:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading