मराठी बातम्या /बातम्या /Viral /काय म्हणावं हिला! कधीच हात धूत नाही ही महिला; विचित्र सवयीचं कारणही आहे अजब

काय म्हणावं हिला! कधीच हात धूत नाही ही महिला; विचित्र सवयीचं कारणही आहे अजब

कधीच हात न धुणाऱ्या या महिलेने याचं कारणही तितकंच विचित्र दिलं आहे.

कधीच हात न धुणाऱ्या या महिलेने याचं कारणही तितकंच विचित्र दिलं आहे.

कधीच हात न धुणाऱ्या या महिलेने याचं कारणही तितकंच विचित्र दिलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

    नवी दिल्ली, 31 मार्च : हात धुणं ही सर्वसामान्य बाब आहे. कोरोनाच्या काळात तर ही बाब जास्त महत्त्वाची आहे. या काळात स्वच्छता राखणं सर्वांत महत्त्वाचं आहे. कारण हात न धुतल्यास, ज्याला स्पर्श कराल त्या ठिकाणी जंतुसंसर्ग होऊ शकतो. अशातच हात न धुता खाल्लं तर जिवाणू शरीरात प्रवेश करतील. यामुळे आतड्याच्या संसर्गापासून अनेक आजार होऊ शकतात; पण एका महिलेनं काहीसा अजब दावा केला आहे. 'मी बाथरूममध्ये गेल्यानंतर कधीही हात धूत नाही. इतकंच नाही तर मी इतरांनाही असं करायला सांगते,' असं या महिलेने सांगितलं; पण यामागचं कारण जरा आश्चर्यकारक आहे.

    सोफिया नावाच्या या महिलेनं टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला असून, तो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत सात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. `मला माहिती आहे की हात धुणं आवश्यक आहे. कारण यामुळेच संसर्ग टाळता येऊ शकतो; पण संसर्ग होईल, असं कोणतंही काम तुम्ही करू नका. मी टॉयलेटला जाते तेव्हा अशा ठिकाणी हाताचा वापर करणं टाळतं, जिथून संसर्ग पसरू शकतो,` असं सोफियानं सांगितलं.

    असं पहिल्यांदाच घडलं! माणसाला झाला 'झाडांचा आजार', जगातील पहिलं प्रकरण भारतात

    आपले हात खराब नसतील तर अन्न खाण्यापूर्वी हात धुण्याची खरंच गरज आहे का? त्यामुळे पाणी आणि इतर गोष्टींचा अपव्यय होतो. `लघवी करताना ती हातावर किंवा शरीरावर येऊ नये, यासाठी कशी काळजी घ्यायची हे मला माहिती आहे. मग हात धुण्याची काय गरज आहे,` असा प्रश्न सोफिया उपस्थित करते. `यामुळे अनेक वेळा मला लाजिरवाणेपणाला सामोरं जावं लागतं,` असं सोफिया आवर्जून नमूद करते. सोफियाच्या या मताशी अनेक जण सहमत आहेत तर अनेकांनी तिला ट्रोलदेखील केलं आहे. `टॉयलेट फ्लशरला हात लावल्यास संसर्ग पसरू शकतो,` असं एका युझरनं म्हटलं आहे. `थोड्या पाण्याचा तरी वापर करावा,` असं एका युझरने सुचवलं आहे.

    वेदनेने जोरजोरात किंचाळतात झाडे-वनस्पती; संशोधनात मोठा दावा

    खरं तर, जंतू दीर्घकाळ मानवी शरीरावर जिवंत राहू शकतात. टॉयलेटचा वापर केल्यानंतर हात धुतले नाही, तर इतरांसाठी परिस्थिती आणखी वाईट होईल. त्वचा, त्यातही विशेषतः चेहरा जास्त संवेदनशील असतो. जेव्हा त्वचेला हात न धुता स्पर्श करता तेव्हा त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्वचेवर पुरळ, डाग किंवा जळजळ होऊ शकते.

    First published:
    top videos

      Tags: Viral