मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लज्जास्पद! 'तिनं' नाचत आनंदानं दिली पतीच्या खुनाबद्दलची माहिती, Video Viral

लज्जास्पद! 'तिनं' नाचत आनंदानं दिली पतीच्या खुनाबद्दलची माहिती, Video Viral

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका महिलेचा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका महिलेचा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका महिलेचा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 नोव्हेंबर :  'पती' हा आयुष्यभराचा जोडीदार असतो, असं म्हटलं जातं. त्याला पत्नीच्या सर्व चांगल्या-वाईट सवयी, तिच्यातील गुण-दोष माहिती असतात. तरीही पती आपल्या पत्नीची आयुष्यभर सोबत करतो. मात्र, जर आपल्यावर जीवपाड प्रेम करणाऱ्या पतीचा मध्येच मृत्यू झाला तर? कोणत्याही महिलेच्या मनावर या घटनेचा मोठा आघात होतो. काहीजणी तर अनेक वर्ष या धक्क्यातून सावरू शकत नाहीत. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका महिलेचा व्हिडिओ बघून तुमचा वरील सर्व गोष्टींवर असलेला विश्वास उडून जाईल.

हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. व्हायरल क्लिपमध्ये, एक महिला आनंदाने नाचून आठ वर्षांपूर्वी झालेल्या पतीच्या हत्येची गोष्ट सांगताना दिसत आहे. सोशल मीडिया युजर्सना महिलेची ही पद्धत अजिबात आवडलेली नाही. त्यांनी या महिलेवर जोरदार टीका केली आहे. त्यात महिला, पुरूष दोघंही आहेत. काहींनी महिलेला विक्षिप्त म्हटलं आहे, तर काहींनी तिचं हे कृत्य लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

व्हिडिओमधील महिलेचं नाव जेसिका आयर्स असं आहे. जेसिकाचं टिकटॉकवर ‘द सिंगिंग विडो’ नावाचं अकाउंट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये जेसिकाच्या पतीची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. पतीची हत्या होण्याच्या तीनच दिवसांपूर्वी तिने एका मुलाला जन्म दिला होता. तिने अलीकडेच पती डॉन हॉगच्या हत्येची कहाणी सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जेसिकाने पतीच्या हत्येची घटना नाचत हातवारे करून सांगितली आहे. तिच्या या व्हिडिओनं इंटरनेट युजर्स गोंधळून गेले आहेत.

ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ 26 सेकंदांचा आहे. या क्लिपला आतापर्यंत 60 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत, तर 2.2 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. या शिवाय अनेकांनी तो शेअरही केला आहे. काहींनी ही क्लिप पाहिल्यानंतर कमेंट करून जेसिकाला धारेवर धरलं आहे.

सिंह आहे का पाळलेली मांजर? Video पाहून डोळ्यावर बसणार नाही विश्वास

'किमान तिने पतीच्या मृत्यूबद्दल आदराने बोलायला हवं, एखादी व्यक्ती कोणाच्याही मृत्यूबद्दल डान्स करून आनंद कसा साजरा करू शकते,' अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत. एका युजरनं कमेंट केली आहे की, 'पतीच्या मृत्यूचा तमाशा करू नका.' एकूणच, अनेकजण जेसिकाच्या व्हिडिओवर नाराजी व्यक्त करत आहेत.

First published:

Tags: Video viral