Home /News /viral /

महिला मंत्री मुलाखत देत होत्या अन् मुलगा गाजर दाखवत होता, विचित्र घटनेचा VIDEO व्हायरल

महिला मंत्री मुलाखत देत होत्या अन् मुलगा गाजर दाखवत होता, विचित्र घटनेचा VIDEO व्हायरल

कार्मेल सेपुलोनी एक मुलाखत (Online Interview) देत होत्या, इतक्यात अचानक त्यांचा मुलगा खोलीत आला आणि गाजर दाखवू लागला.

    नवी दिल्ली 01 सप्टेंबर: इंटरनेटवर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ न्यूझीलंडच्या सामाजिक विकास मंत्री कार्मेल सेपुलोनी यांचा आहे. कार्मेल सेपुलोनी एक मुलाखत (Online Interview) देत होत्या, इतक्यात अचानक त्यांचा मुलगा खोलीत आला आणि गाजर दाखवू लागला. कार्मेल सेपुलोनी (Carmel Sepuloni Video) आपल्या मुलाला गाजर दाखवण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र, तरीही त्यानं ऐकलं नाही. सामाजिक विकास मंत्री कार्मेल सेपुलोनी रेडिओ समोआच्या लाईव्ह झूम (Zoom Live) मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधत होत्या. इतक्यात त्यांचा मुलगा आईला घरात सापडलेलं विचित्र दिसणारं गाजर दाखवण्यासाठी खोलीत शिरला. मुलाखतीच्या मध्येच येऊन तो गाजर दाखवू लागला आणि कार्मेल त्याला वारंवार थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या. VIDEO: छताला लटकताना दिसलं महिलेचं डोकं; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन हा व्हिडिओ 70 हजारहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. कार्मेल यांनी माफी मागत म्हटलं, की एक सेकंदा थांबा, माझा मुलगा रुममध्ये आहे. मात्र, हसत हसत त्यांच्या मुलानं गाजर दाखवणं सुरु ठेवलं. यानंतर कार्मेल त्याच्या हातातील गाजर ओढण्याचा प्रयत्न करू लागल्या. नंतर हा मुलगा रुममधून बाहेर गेला. मंत्री कार्मेल सेपुलोनी यांनी आपल्या मुलाच्या हातातून गाजर ओढतान म्हटलं, की मी एक मुलाखत करत आहे आणि ऑनलाईन आहे. यानंतर त्यांच्या मुलानं उत्तर दिलं 'ओह'. कार्मेल यांनी नंतर ही मजेशीर घटना आपल्या ट्विटरवरुन शेअर केली आणि सांगितलं, की त्यावेळी त्यांना खूप विचित्र वाटलं. मात्र, आता ही घटना आठवल्यावर हसू आवरत नाही. रात्रीच्या अंधारात घरात शिरला बिबट्या अन्...; धडकी भरवणारा VIDEO आला समोर कार्मेल सेपुलोनी यांनी ट्विटरवर लिहिलं, की तो क्षण जेव्हा तुम्ही झूमच्या माध्यमातून एक लाईव्ह मुलाखत देत आहात आणि तुमचा मुलगा ओरडत रुममध्ये येतो अन् विचित्र गाजत दाखवू लागतो. आम्ही कॅमेऱ्यासमोरच यावरुन जवळपास कुस्तीच करत होतो. आता हे पाहून मला हसू येतं, मात्र त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Funny video, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या