• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • भीतीदायक बाहुलीसोबत लग्न करत तरुणीने केला 6 वर्ष संसार; आता शोधला अजब बॉयफ्रेंड

भीतीदायक बाहुलीसोबत लग्न करत तरुणीने केला 6 वर्ष संसार; आता शोधला अजब बॉयफ्रेंड

फ़ेलिसिटीच्या आईचा मृत्यू झाल्यानं तिच्या वडिलांनी तिला ही बाहुली खरेदी करून दिली. मुलाखतीत फेलिसिटीनं सांगितलं, की हळूहळू ती डॉलच्या खूप जवळ आली आणि तिच्या प्रेमात वेडी झाली.

 • Share this:
  नवी दिल्ली 02 नोव्हेंबर : जगात अगदी वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. यातील काही असे असतात ज्यांना पाहताच आपण हैराण होतो. हे लोक अशा काही हरकती करतात ज्या अतिशय विचित्र (Weird News) असतात. सध्या अशीच एक तरुणी चर्चेत आहे. 23 वर्षाच्या फेलिसिटीचं 16 वर्षाच्या वयातच एका जॉम्बी डॉलवर प्रेम जडलं. या बाहुलीच्या प्रेमात ती वेडी होती. यानंतर कुटुंबीयांच्या साक्षीने तिने या बाहुलीसोबत लग्न केलं (Woman Marries with Zombie Doll). आता ती आपल्या डॉल पत्नीसोबत सहा बाळांना सांभाळत आहे. मात्र आता तिला एका एलियन डॉलवर प्रेम झालं आहे. यानंतर आता दोघांचं अफेअर सुरू झालं आहे (Affair with Alien Doll). चविष्ट स्वयंपाक न केल्यानं पत्नी-सासूने घरजावयाची केली धुलाई; प्रकरण पोलिसात अमेरिकेत राहणारी फेलिसिटी यूट्यूब चॅनेल चालवते. Dollygirl20 नावाने बनवलेल्या तिच्या अकाऊंटवर तिचे आपल्या जॉम्बी पत्नीसोबतचे अनेक व्हिडिओ आहेत. तिनं 2018 मध्ये आपल्या लेस्बियन डॉलसोबत लग्न केलं. तिनं 13 वर्षाची असतानाच ही डॉल पसंत केली होती. मात्र, तेव्हा तिच्या आई-वडिलांनी ही डॉल भीतीदायक असल्याचं सांगत विकत घेण्यास नकार दिला होता. मात्र, काही वर्षांनंतर फ़ेलिसिटीच्या आईचा मृत्यू झाल्यानं तिच्या वडिलांनी तिला ही बाहुली खरेदी करून दिली. द सन यूएसला दिलेल्या मुलाखतीत फेलिसिटीनं सांगितलं, की हळूहळू ती डॉलच्या खूप जवळ आली आणि तिच्या प्रेमात वेडी झाली. नंतर तिच्या वडिलांचाही मृत्यू झाला, अशात सगळी सुख-दुःख वाटायला ही बाहुलीच तिच्यासोबत होती. 2018 मध्ये तिनं डॉलसोबत लग्न केलं. तिच्या दाव्यानुसार यानंतर दोघींनी सहा ' डॉल बाळांना' जन्मही दिला. फेलिसिटी त्यांची खूप काळजी घेते. त्यांचे कपडे बदलते, त्यांना झोपवते. मात्र, फेलिसिटीचं म्हणणं आहे, की लोक तिला खूप जज करतात. तिला खूप ट्रोल केलं गेलं होतं. मात्र, ती आपली पत्नी आपल्या मुलांसोबत खूप खूश होती. लोकांचं बोलणं ऐकून अनेकदा तिच्या मनात आत्महत्येचा विचारही आला. मात्र तिनं आपली पत्नी आणि बाळांची साथ सोडली नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून एका एलियन डॉलवर तिचं प्रेम जडलं आहे. तिनं सांगितलं की आता ती या एलियन डॉलकडे आकर्षित झाली आहे. कुत्र्याचा छळ करत होता निर्दयी व्यक्ती; मदतीसाठी येत गाईनं घडवली अद्दल, VIDEO फेलिसिटीनं याआधी डॉल पत्नीला सोडून माणसांना डेट करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, तिथे तिला धोका मिळाला. यामुळे ती पुन्हा डॉलकडेच परतली. सध्या तिचं मन एलियन डॉलकडे आकर्षित झालं आहे. तिनं सांगितलं की ही एलियन डॉल तिची सुरक्षा करते. तिला डॉलसोबत सुरक्षित वाटतं.
  Published by:Kiran Pharate
  First published: