नवी दिल्ली 02 मार्च : बऱ्याच लोकांना आपल्या आयुष्यात अभ्यास आणि शिक्षण करून अशी नोकरी मिळवायची असते, ज्यामुळे त्यांना पैसा आणि सन्मान दोन्ही मिळेल. आजकाल लोकांना हे दोन्ही कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्ये मिळत आहे. मात्र आता एका महिलेचं अजब प्रकरण समोर आलं आहे. यात एका महिलेने तिची नोकरी फक्त यासाठी सोडली कारण तिला दुसऱ्यांची घरं साफ करण्याचं काम करायचं होतं.
रोडवरील सँडविच ते टपरीचा चहा, फॉरेन अधिकारी-नेत्यांचा इंडियन स्ट्रिट फूडवर ताव; म्हणाले...
आम्ही बोलतोय अमेरिकेत राहणारी ३७ वर्षीय महिला केलीन केलीबद्दल. केलीन पूर्वी चांगली कॉर्पोरेट नोकरी करत होती, त्यामुळे तिला लाखो रुपये वार्षिक पगारही मिळत होता. मग एके दिवशी तिने नोकरी सोडून असं काम हाती घेतलं, जे प्रत्येकालाच करणं जमेल असं नाही. आज केलीन इतर लोकांची घरे साफ करून आणि सजवून तिच्या जुन्या नोकरीपेक्षा 4 पट जास्त पैसे कमवत आहे.
फ्लोरिडा येथील रहिवासी असलेल्या केलीने 2015 मध्ये तिची कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि नवीन उपक्रम म्हणून लोकांची गलिच्छ आणि अस्वच्छ घरं सजवण्याचं काम करण्यात सुरुवात केली. मेट्रोच्या अहवालानुसार, केलीने आतापर्यंत 10-20 नव्हे तर एक हजार ग्राहकांच्या घरांची साफसफाई आणि कायापालट करण्याचं काम केलं आहे. या कामासाठी ती लोकांकडून खूप पैसे घेते. पूर्वी, जिथे ती 28 हजार डॉलर/वर्ष कमावत होती, आता ती एक लाख डॉलर्स म्हणजेच 82 लाख रुपये कमवत आहे.
लकी ड्रॉमध्ये जिंकली 1 कोटीची कार; पण आनंद टिकलाच नाही, काहीच दिवसात भयानक अपघात झाला अन्...
आपल्या कामाचे वर्णन करताना केली सांगते की, 2014 मध्ये तिने 'केली होम ऑर्गनायझिंग अँड रीडिझाइन' सेवा सुरू केली. ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही असे वाटल्यावर तिने नोकरी सोडली. पहिल्याच वर्षी तिने 40 हजार डॉलर्स कमावले. ती अस्वच्छ घरं 4 प्रकारे ट्रांसफॉर्म करते, यात साफसफाईपासून खराब वस्तू काढून टाकणं आणि नव्या वस्तू ठेवणं, हेदेखील आहे.. तिने फक्त 3 लोकांचा स्टाफ ठेवला आहे आणि आठवड्यातून 23 तास म्हणजे दिवसाचे फक्त 3 किंवा साडेतीन तास काम केलं जातं. या कामातून ती सुमारे एक कोटी रुपये कमावते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Viral news