Home /News /viral /

विंडो सीटसाठी काहीही! विमान प्रवासादरम्यान महिलेचं धक्कादायक कृत्य; VIDEO पाहून भडकले नेटिझन्स

विंडो सीटसाठी काहीही! विमान प्रवासादरम्यान महिलेचं धक्कादायक कृत्य; VIDEO पाहून भडकले नेटिझन्स

विंडो सीटसाठी महिलेने केलेला प्रताप एका प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

    मुंबई, 22 जून : प्रवास करताना विंडो सीटवर बसायला कुणाला आवडत नाही. बस, लोकल ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसण्यासाठी लोकांची धडपड तुम्हाला माहितच असेल. पण विमानातही विंडो सीटसाठी प्रवासी असं काही करत असतील, यावर साहजिकच कुणाचा विश्वास बसणार नाही. पण सध्या सोशल मीडियावर असाच धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे (Social media viral). विंडो सीटसाठी महिलेने विमानात असं काही केलं की ते पाहून नेटिझन्स भडकले आहेत (Woman jumps over passengers in plane). विमान प्रवासादरम्यान महिलेने जे केलं ते पाहून नेटिझन्सच्या रागाचा पारा चढला आहे. विमानातील दुसऱ्या एका प्रवाशाने महिलेचा प्रताप आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. जो तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक महिला पाठमोरी दिसते आहे. त्यानंतर ती तिच्यासमोर असलेल्या व्यक्तीच्या सीटवर पाय ठेवते. त्यावेळी व्यक्ती व्यक्ती सीटवर बसली आहे. त्यानंतर ही महिला अशीच पुढे जाते. मधल्या सीटवर एक लहान मुलगाही बसलेला दिसतो. पण तरी या महिलेला काहीच फरक पडत नाही. शेवटी विंडो सीटवर जाऊन ती बसते. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स संतप्त झाले आहेत. या महिलेला असं करूच का दिलं? तिला कुणी अडवलं का नाही? असा सवाल नेटिझन्सनी विचारला आहे. हे वाचा - VIDEO- ग्राहकांनी असं काही केलं की महिला वेटर झाली संतप्त; रेस्टॉरंटमध्येच धू धू धुतलं @In_jedi ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. विमानात पाहिलेली आतापर्यंतचा हा सर्वात मोठा गुन्हा आहे, ही महिला 7 तासांच्या विमान प्रवासात इतर प्रवाशांना अशीच तुडवत जात होती, अशी माहिती हा व्हिडीओ पोस्ट करताना ट्विटमध्ये देण्यात आली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Airplane, Viral, Viral videos

    पुढील बातम्या