नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही. एक महिलेचा व्हिडीओ समोर आला असून तिने चक्क साडीमध्ये नदीत उडी मारली आहे. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं घेतलं आहे.
पुलावरून उडी मारून नदीत जाणे किती धोकादायक आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. एक प्रकारे, हा एक धोकादायक स्टंट आहे ज्यासाठी खूप धैर्य आवश्यक आहे. नुकताच अशी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला होता, जो आता सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला धोकादायक स्टंट करताना दिसत आहे.
हेही वाचा - Viral Video : ऑटोलाच बनवली डिझायनर कार, व्यक्तीचा हटके जुगाड पाहून सगळेच थक्क
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, साडी नेसलेली 55-60 वर्षांची महिला पुलाजवळ येते आणि काहीही विचार न करता नदीत उडी मारते. व्हिडीओ पाहिल्यास नदीपासून पुलाची उंची बरीच आहे. ज्यावरून एखादा तरुण उडी मारण्याचा किमान दहा वेळा विचार करेल. मात्र इथे महिलेने काहीही विचार न करता उडी घेतली. ते ही चक्क साडी घालून.
Awestruck to watch these sari clad senior women effortlessly diving in river Tamirabarni at Kallidaikurichi in Tamil Nadu.I am told they are adept at it as it is a regular affair.😱Absolutely inspiring 👏 video- credits unknown, forwarded by a friend #women #MondayMotivation pic.twitter.com/QfAqEFUf1G
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) February 6, 2023
हा व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी शेअर केला आहे. ज्यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ती महिला तामिळनाडूमधील कल्लीडायकुरीची येथील आहे जिथे महिला दररोज ताम्रबर्णी नदीत उडी मारते. महिलेचा हा व्हिडिओ खूपच प्रेरणादायी आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकवेळा व्हिडीओ फनी असतात, जे पाहून आपण हसतो, तर दुसरीकडे अनेकवेळा असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित होतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओही असाच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Top trending, Video viral, Viral, Viral news