धक्कादायक! दात घासताना चुकून गिळला टुथब्रश, X-ray रिपोर्ट पाहून हादरले डॉक्टर

धक्कादायक! दात घासताना चुकून गिळला टुथब्रश, X-ray रिपोर्ट पाहून हादरले डॉक्टर

बापरे, X-ray रिपोर्टमध्ये डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून त्यांनाही दोन क्षण काही कळलं नाही.

  • Share this:

रियाद, 03 नोव्हेंबर : सौदी अरेबियामध्ये डॉक्टरांसमोर एक विचित्र केस आली. इथं एका महिलेच्या पोटातून डॉक्टरांना चक्क दात घासण्याचे ब्रथ आढळून आले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ब्रश गिळलेल्या या महिलेवर मक्का येथील 'ए 1 नूर हॉस्पिटल' मध्ये उपचार करण्यात आले. पोटातून टूथब्रश काढून टाकल्यानंतर, स्वत: महिलेने सांगितले की, दात घासत असताना तिनं चुकून ब्रश गिळले.

20 वर्षीय महिलेने रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या डॉक्टरांना सांगितले की, दात घासत असताना तिने अचानक ब्रश गिळले होते. तरुणीनं सांगितले की, दात घासत असताना अचानक घश्या गेला, तिने ब्रश काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी ब्रश तिच्या पोटात गेला. त्यानंतर तरुणी त्वरित रुग्णालयात गेली.

वाचा-ड्रग्जच्या नशेत पठ्ठ्यानं उधळले लाखो रुपये, रस्त्यावर नोटांचा ढीग; पाहा VIDEO

तरुणी रुग्णालयात आल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी, एक्स-रे आणि सीटी स्कॅन करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यास उशीर केला नाही. अवघ्या 20 मिनिटांत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. मोहम्मद फौझी यांच्या पथकाला गॅस्ट्रोकोपीच्या माध्यमातून महिलेच्या पोटातून ब्रथ काढण्यात यश आहे.

वाचा-VIDEO: एक डाव भुताचा; मुलाला भुताने उचलून नेलं आणि...

रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेचे सहाय्यक संचालक डॉ मोतलख अल मालकी यांनी सांगितले की, ब्रश तरुणीच्या पोटातून यशस्वीरित्या काढले गेले आहे आणि आता ती पूर्णपणे निरोगी आहे.

वाचा-कारच बोनेट उघडताच दिसला 10 फूटांची अजगर, पुढे काय झालं पाहा VIDEO

दरम्या, याआधीही अशी एक घटना घडली होती. काही महिन्यांपूर्वी अरुणाचल प्रदेशातही 39 वर्षीय व्यक्तीने 19 सेंमी लांबीचा टूथब्रश गिळला होता. 24 तासांच्या ऑपरेशननंतर डॉक्टरांना ब्रश काढण्यात यश आले होते.

Published by: Priyanka Gawde
First published: November 3, 2020, 12:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या