मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : कोरोना काळात माणुसकीचं दर्शन; नेत्रहीन वृद्धासाठी बसमागे धावली महिला

VIDEO : कोरोना काळात माणुसकीचं दर्शन; नेत्रहीन वृद्धासाठी बसमागे धावली महिला

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनेही या महिलेचं कौतुक केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनेही या महिलेचं कौतुक केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनेही या महिलेचं कौतुक केलं आहे.

मुंबई, 13 जुलै: सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नेत्रहीन व्यक्तीला एक महिला मदत करताना दिसत आहे. नेत्रहीन असलेल्या या वृद्ध व्यक्तीसाठी महिलाा बसमागे धावत सुटल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. महिलेनं केलेल्या या मदतीचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. आयपीएस अधिकारी विजय कुमार ते बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखपर्यंत अनेक दिग्गजांनी या महिलेचं कौतुक केलं आहे.

नेत्रहीन वृद्ध व्यक्तीला बस पकडायची होती. मात्र धावत जाता येत नसल्यानं महिलेनं धावत जाऊन बस थांबली आणि या वृद्ध व्यक्तीला बसमध्ये बसवण्यास मदत केली. कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्स आणि भीती असतानाही या महिलेनं या वृद्ध व्यक्तीला माणुसकीच्या नात्यानं केलेल्या धाडस आणि मदतीचं तुफान कौतुक होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-माकडही करतंय कोरोनापासून आपला बचाव; MASK घालून फिरतानाचा VIDEO VIRAL

विजय कुमार यांनी 8 जुलै रोजी संध्याकाळी हे पोस्ट केले. आतापर्यंत हा व्हिडीओ 4 लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे तर 7 हजारहून अधिक युझर्सनी रिट्वीट केलं आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनेही या महिलेचं कौतुक केलं आहे. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी बऱ्याचदा मदत केली जाते. मात्र या महिलेला तर माहीत ही नसेल आपण कॅमेऱ्यात कैद होत आहोत. अशा प्रकारच्या कमेंट्स युझर्सनी केल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms