मराठी बातम्या /बातम्या /Viral /

TikTok व्हिडिओसाठी महिलेनं स्वतःच्या लहान मुलीलाच छळलं; वैतागलेल्या पतीनं घेतला मोठा निर्णय

TikTok व्हिडिओसाठी महिलेनं स्वतःच्या लहान मुलीलाच छळलं; वैतागलेल्या पतीनं घेतला मोठा निर्णय

29 जणांकडून  15 वर्षीय मुलीवर 9 महिने गँगरेप, 4 वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार (प्रातिनिधिक फोटो)

29 जणांकडून 15 वर्षीय मुलीवर 9 महिने गँगरेप, 4 वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार (प्रातिनिधिक फोटो)

महिलेनं इन्स्टाग्राम (Instagram) आणि टिकटॉकवर प्रँक व्हिडिओ (Prank Videos) बनवण्याच्या नादात आपल्या सहा वर्षाच्या मुलीला इतकं घाबरवलं की आता या चिमुकलीला आपल्या आईजवळ जाण्याचीही भीती वाटते.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 12 सप्टेंबर : आजकाल काही लोक सोशल मीडियाच्या (Social Media) इतके आहारी गेले आहेत की त्यापुढे त्यांना काहीच दिसत नाही. अशीच एक हैराण करणारी घटना (Shocking News) नुकतीच समोर आली आहे. एका पतीनं सोशल मीडिया साईट रेडिटवर सांगितलं, की आपल्या पत्नीच्या या सवयीमुळे तो वैतागला आहे आणि असंच चालत राहिल्यास त्याला घटस्फोट (Divorce) घ्यावा लागेल. या व्यक्तीनं सांगितलं, की पत्नीनं इन्स्टाग्राम (Instagram) आणि टिकटॉकवर प्रँक व्हिडिओ (Prank Videos) बनवण्याच्या नादात आपल्या सहा वर्षाच्या मुलीला इतकं घाबरवलं की आता या चिमुकलीला आपल्या आईजवळ जाण्याचीही भीती वाटते.

भल्यामोठ्या किंग कोब्रानं सापाला जिवंतच गिळलं; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

या व्यक्तीनं सांगितलं, की त्याची पत्नी घरातील कामं, साफसफाई आणि किचनमधील शॉर्ट व्हिडिओ बनवून टिकटॉकवर अपलोड करते. काही दिवसांपासून तिनं आपल्या मुलीसोबतच प्रँक करायला सुरुवात केली. यात तिनं मुलीला नकली भूताची भीती दाखवून घाबरवलं. मुलगी घाबरून रडू लागली मात्र इतकं सगळं होऊनही ही महिला हसत होती. या व्यक्तीनं आपल्या पत्नीला समजवण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र तिनं काहीही ऐकलं नाही. या व्यक्तीनं रेडिटवर आपली व्यथा लिहित सांगितलं, की आता त्यांची मुलगी इतकी घाबरली आहे की एकटी घरात झोपायलाही घाबरत आहे.

काही फॉलोअर्सच्या मनोरंजनासाठी मुलीला घाबरवू नको असं पतीनं आपल्या पत्नीला सांगितलं. मात्र, महिलेनं पतीसोबतच भांडण केलं. पतीनं सांगितलं, की काही हजार फॉलोअर्स होताच महिला पूर्णपणे बदलली. आता ती काउन्सलिंगलाही नकार देत आहे. अशात आत मुलीच्या चांगल्यासाठी पतीकडे केवळ घटस्फोटाचाच पर्याय आहे.

पुलावर स्टंट करणं भोवलं; अचानक तोल गेल्यानं गाडीसह धाडकन कोसळला तरुण, VIDEO

रेडिटवर लिहिलेल्या या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं पोस्टवर रिप्लाय देत म्हटलं, की महिलेचं हे कृत्य लाजीरवाणं आहे. हे लहान मुलांचं शोषण आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की मस्करी आपल्या जागी असते मात्र अशाप्रकारे मुलांना भीती दाखवणं चुकीचं आहे. अनेकांनी असंही म्हटलं की मुलांपेक्षा टिकटॉक महत्त्वाचं नाही. त्यामुळे महिलेवर कारवाई व्हायला हवी. काही वेळानंतर या व्यक्तीनं आणखी एक पोस्ट शेअर केली. यात त्यानं सांगितलं, की त्यानं आपल्या पत्नीसोबत बातचीत केली आहे आणि पत्नीनं आल्या या चुकीसाठी माफी मागितली आहे.

First published:

Tags: Video Viral On Social Media, Viral news