Home /News /viral /

OMG! तरुणीने पाण्यात केला इतका जबरदस्त Stunt; पुन्हा पुन्हा पाहाल हा VIDEO

OMG! तरुणीने पाण्यात केला इतका जबरदस्त Stunt; पुन्हा पुन्हा पाहाल हा VIDEO

तरुणीने पाण्यात असा स्टंट करून दाखवला आहे, जो अनेकांना जमिनीवरही शक्य नाही.

  मुंबई, 14 मे : पाण्यात पोहोणं, बोटिंग, सर्फिंग हे तुम्हाला माहितीच असेल. असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण एका तरुणीने पाण्यात असं जबरदस्त करतब करून दाखवलं आहे की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला आहे. तरुणीने पाण्यात इतका खतरनाक स्टंट केला आहे, जो पाहून नेटिझन्स भारावले आहेत  (Woman stand on water viral video). जमिनीवर स्टंट करणारे बरेच लोक आहे. पण जमिनीइतकं पाण्यात स्टंट करणं तसं सोपं नाही. पाण्याची हालचाल होत असते, पाण्याचा एक वेग असतो, ज्यावर आपलं नियंत्रण नसतं. त्यामुळे पाण्यात स्टंट करताना आपला बॅलेन्स सांभाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा तर बोटीत किंवा जहाजात बसल्यावर ते हलतानाही आपल्या हृदयाची धडधड वाढते. अशात पाण्यात एखादा स्टंट करण्याचा तर आपण विचारही करणार नाही  (Woman amazing stunt on water). हे वाचा - बाबो! थेट जंगलाच्या राजा सिंहाशीच तरुणाने केली मैत्री, 10 वर्षे त्याच्यासोबत राहिला अखेर...; शॉकिंग VIDEO VIRAL व्हिडीओत पाहू शकता एक महिला पाण्यात पॅडल बोर्डवर उभी आहे. तसं ती ज्या पाण्यात आहे, ते पाणी स्थिर आहे पण तरी पाण्यात थोडी हालचाल होतेच आहे. अशा पाण्यात एखाद्या बोर्डवर स्थिर राहणं तसं कठीण. म्हणजे नीट उभंही राहता येणार नाही. पण ही तरुणी या बोर्डवर हँडस्टँड करते.
  View this post on Instagram

  A post shared by ViralHog (@viralhog)

  ती ज्या बोर्डवर उभी आहे, तो पॅडल बोर्ड आहे. त्या बोर्डवरील रॉडला ती पकडते आणि आपले पाय वर करते. म्हणजे खाली डोकं वर पाय या स्थितीत ती आहे. हातावरच आपल्या शरीराचा भार झेलते. फक्त हातावर उभी राहते. असा स्टंट जमिनीवर करताना तुम्ही काही लोकांना पाहिलं असेल. जमिनीवरच अनेकांना हा स्टंट जमत नाही. मग पाण्यात बॅलेन्स सांभाळणं वाटतं तितकं नक्कीच सोपं नाही आहे. हे वाचा - Oh no! खाणं भरवताना भल्यामोठ्या माशाने व्यक्तीचा हातही खाल्ला; अंगावर काटा आणणारा VIDEO हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. तरुणीचा लवचिकपणा आणि तिचं संतुलने पाहून भारावले आहेत. असं करतब पाण्यात करणं आणि इतकं बॅलेन्स करणं हे नक्कीच सोपं नाही.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Stunt video, Viral, Viral videos

  पुढील बातम्या