मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! महिलेची छाती पाहून डॉक्टरही झाले शॉक; विचित्र बदलाचं कारणही समजेना

OMG! महिलेची छाती पाहून डॉक्टरही झाले शॉक; विचित्र बदलाचं कारणही समजेना

वयात येताच छातीवरील बदल पाहून महिला हैराण.

वयात येताच छातीवरील बदल पाहून महिला हैराण.

महिलेच्या छातीत जो बदल झाला तो इतर महिलांपेक्षा खूपच वेगळा आहे.

  • Published by:  Priya Lad
लंडन, 18 ऑगस्ट : जसजसं वय वाढतं तसतसं शरीरात काही बदल दिसू लागतात. मुलामुलींमधील हे बदल वेगवेगळे असतात. मुलांना दाढी-मिशी येते, छातीवर केस येऊ लागतात. तर महिलांच्या छातीचा म्हणजे ब्रेस्टचा आकार वाढू लागतो. पण एक मुलगी वयात आल्यानंतर तिच्यात जो बदल झाला तो पाहून डॉक्टरही शॉक झाले. इतर महिलांपेक्षा तिची छाती खूपच वेगळी होती. तिच्या छातीतील या बदलाचं नेमकं कारण डॉक्टरांनाही समजेना. सोशल मीडिया स्टार बेक्का बुचरने आपल्या प्युबर्टीचा अनुभव लोकांसोबत शेअर केला आहे. ती ज्या समस्येचा सामना करते आहे, त्याचं कारण डॉक्टरांनाही समजू शकलं नाही. बेक्का म्हणाली, जेव्हा ती वयात येत होती, तेव्हा तिच्या शरीरात विचित्र बदल पाहायला मिळाला. सामान्यपणे मुलींची ब्रेस्ट ग्रोथ होते. पण तिच्याबाबतीत हे उलट होतं. तिच्या छातीच्या एक भाग इतर मुलींसारखा वाढला पण निम्मा भाग पुरुषांसारखाच सपाट राहिला. म्हणजे शरीराचा निम्म्या भागाने ती पुरुष आणि निम्माया भागाने महिला झाली. हे वाचा - पॉटी होईना म्हणून डॉक्टरांकडे नेलं; एक्स-रेमधून बायकोसमोर आलं नवऱ्याचं लज्जास्पद कृत्य बेक्का आपल्या या विचित्र समस्येचं कारण समजून घ्यायला डॉक्टरांकडेही गेली. पण डॉक्टरांनाही तू अजून किशोरवयात आहेस तारुण्यात येशील तेव्हा सर्व ठिक होईल. दोन्ही ब्रेस्ट समान होतील, असं सांगून तिला घरी पाठवून दिलं आणि काही वर्षांनी बदल जाणवला नाही तर पुन्हा येण्यास सांगितलं. पण तिच्या छातीत काहीच बदल झाला नाही. ती जशी आहे तशीच आहे. हे वाचा - बापरे! सहकाऱ्याने तरुणीला इतकी घट्ट मिठी मारली की बरगड्यांची 3 हाडंच तुटली, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा त्यानंतर ती बऱ्याच डॉक्टरांना भेटली. त्यांनाही तिच्या समस्येचं नेमकं कारण समजलं नाही. डेली स्टार यूकेच्या रिपोर्टनुसार एका नर्सकडून तिला मिळालेल्या माहितीनुसार तिला पोलंड सिंड्रोम आहे. पण याबाबत अधिकृत निदान झालेलं नाही.
First published:

Tags: Viral

पुढील बातम्या