• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 60 वर्षांनंतर महिलेला मिळाली प्रियकराने लिहिलेली ती प्रेमपत्रं; Love Story वाचून पाणावतील डोळे

60 वर्षांनंतर महिलेला मिळाली प्रियकराने लिहिलेली ती प्रेमपत्रं; Love Story वाचून पाणावतील डोळे

28 वर्षाची युवती चेल्सी ब्राउन हिच्यामुळे महिलेला 60 वर्षांनंतर का होईना पण आपल्या बॉयफेंडने लिहिलेली ती पत्रं मिळाली. चेल्सीला रद्दीच्या दुकानात 60 वर्ष जुने लव्ह लेटर आढळले

 • Share this:
  वॉशिंग्टन 07 नोव्हेंबर : अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधून (New York) एक हैराण करणारी घटना (Shocking Incident) समोर आली आहे. इथे एका महिलेला तिच्या बॉयफ्रेंडनं पाठवलेले लव्ह लेटर (Love Letter of Boyfriend) 60 वर्षांनी मिळाले. 60 वर्षांनंतर आपल्या बॉयफ्रेंडचे हे लव्ह लेटर पाहून महिला ढसाढसा रडू लागली आणि त्याच्या आठवणीत बुडाली. महिलेचा बॉयफ्रेंड सैन्यात (Army) होता. पिल्लाला वाचवण्यासाठी सिंहासोबत भिडली मादी झेब्रा; पाहा शेवटी काय घडलं, VIDEO द मिररमध्ये आलेल्या वृत्तानुसार, 28 वर्षाची युवती चेल्सी ब्राउन हिच्यामुळे महिलेला 60 वर्षांनंतर का होईना पण आपल्या बॉयफेंडने लिहिलेली ती पत्रं मिळाली. चेल्सीला रद्दीच्या दुकानात 60 वर्ष जुने लव्ह लेटर आढळले. हे पाहून चेल्सीनं निर्णय घेतला की ती ही पत्रं त्या महिलेपर्यंत पोहोचवणार, जिच्यासाठी ती लिहिली गेली आहेत. लव्ह लेटरमध्ये महिलेचं नाव कुकी लिहिलं गेलं होतं. तर लव्ह लेटर लिहिणाऱ्याचं नाव बॉबी होतं. चेल्सीनं सोशल मीडियाच्या मदतीनं कुकी निकनेम असणाऱ्या महिलेला शोधलं. यानंतर तिनं कुकीच्या चुलत बहिणीसोबत संपर्क साधला. चेल्सीनं तिला सर्व सांगितं आणि म्हटलं की मला माझ्या हातानं कुकीला हे लव्ह लेटर द्यायचे आहेत. कुकीला शोधण्यासाठी चेल्सीला इतकी मेहनत यासाठी घ्यावी लागली कारण लव्ह लेटरवर महिलेचा पत्ता लिहिलेला नव्हता. दिमाखात स्टंट करायला गेलेल्या तरुणीसोबत घडलं भलतंच; झाली वाईट अवस्था, पाहा VIDEO चेल्सी ब्राऊनने सांगितलं, की जेव्हा कुकीनं आपल्या बॉयफ्रेंडचे ६० वर्ष जुने लव्ह लेटर पाहिले तेव्हा ती भावुक झाली आणि त्याच्या आठवणीत बुडाली. कुकी आता दिवसात कितीतरी वेळा आपल्या बॉयफ्रेंडची ही पत्रं वाचते. कुकीच्या बहिणीनं सांगितलं, की त्या काळी कुकी एक एअर होस्टेस होती. तिचा बॉयफ्रेंड आर्मीमध्ये होता. कुलीला आपल्या बॉयफ्रेंडचे लव्ह लेटर कधी मिळालेच नाहीत. याच कारणामुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published: