मराठी बातम्या /बातम्या /Viral /

2017 मध्ये केलेल्या तक्रारीला विमान कंपनीनं 4 वर्षांनी दिलं उत्तर; रिप्लाय वाचून थक्क झाली महिला

2017 मध्ये केलेल्या तक्रारीला विमान कंपनीनं 4 वर्षांनी दिलं उत्तर; रिप्लाय वाचून थक्क झाली महिला

ट्विटरवर मेगन नावाच्या महिलेन एअऱलाईन कंपनी जेट 2 ला केलेला एक मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे. मेगननं स्वतःच कंपनीसोबत झालेल्या आपल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे.

    नवी दिल्ली 17 ऑक्टोबर : तुम्ही अनेकदा एखाद्या कंपनीच्या (Company) सेवेवर नाराज होत याची तक्रार (Complaint) केली असेलच. तक्रारीनंतर या कंपनीकडून तुम्हाला उत्तरही मिळालं असेल आणि त्यांनी तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्नही केला असेल. मात्र, कधी तुमच्यासोबत असं घडलं आहे, का की तुम्ही एखाद्या कंपनीकडे तक्रार केली आणि अनेक वर्षांनी तुम्हाला उत्तर मिळालं? मात्र, अशीच घटना एका महिलेसोबत घडली आहे. एका विमान कंपनीनं (Airline Company) महिलेच्या मेसेजचं उत्तर अनेक वर्षांनी दिलं. हे पाहून महिला हैराण झाली. फुटबॉलने केला बाईकस्वारांचा 'गोल'; भयंकर अपघाताचं दृश्य CCTV मध्ये कैद ट्विटरवर मेगन नावाच्या महिलेन एअऱलाईन कंपनी जेट 2 ला केलेला एक मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे. मेगननं स्वतःच कंपनीसोबत झालेल्या आपल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे पाहून सगळेच थक्क झाले आहेत. मेगननं २०१७ साली ब्रिटनची एअरलाईन कंपनी जेट २ ला (Jet2 Airlines) ट्विटरवरुन एक मेसेज (Twitter Message) पाठवला होता. जेट २ कंपनी आपल्या स्वस्त फ्लाईट्ससाठी ओळखली जाते. मेगननं ८ जून २०१७ रोजी केलेल्या आपल्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, की मी कॅवोस हॉलिडेसाठी माझ्या दोन मैत्रिणींसोबत तुमच्या विमानाने निघाले होते. आम्ही सोबतच ऑनलाईन चेक इन केलं, मात्र आम्हाला सोबतच सीट मिळाली नाही. जास्त लोकांना प्लेनमध्ये सोबत बसणं शक्य नाही, हे मला माहिती आहे. मात्र, तीन लोक सोबत बसून प्रवास करू शकतात. मी या गोष्टीमुळे खूप नाराज आहे. आरशात स्वतःला बघताच माकडाची मजेशीर रिअ‍ॅक्शन; VIDEO पाहून खळखळून हसाल मेगनच्या या मेसेजचा रिप्लाय कंपनीनं आता दिला आहे. कंपनीनं आपल्या उत्तरात लिहिलं, उशिरा उत्तर देत आहोत यासाठी क्षमस्व. आमच्याकडे भरपूर मेसेज आल्यानं तुमच्या मेसेजचा रिप्लाय द्यायला वेळ लागला. तुम्हाला अजूनही मदतीची गरज आहे का? हा मेसेज पाहून मेगन थक्क झाली. तिनं हा स्क्रीनशॉट ट्विटवर शेअर केला. हे ट्विट ९ हजारहून अधिकांनी रिट्विट केलं आहे. तर, १ लाखहून अधिकांनी हे ट्विट लाईक केलं आहे. ग्रेट कस्टमर सर्व्हिस, असं कॅप्शन देत मेगननं हे ट्विट शेअर केलं. जे सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Travel by flight, Viral news

    पुढील बातम्या