मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Oyster खाता खाताच झाला चमत्कार, मिळाला मौल्यवान खजिना

Oyster खाता खाताच झाला चमत्कार, मिळाला मौल्यवान खजिना

आपल्या अन्नातून आपल्याला काहीतरी मौल्यवान वस्तू मिळेल, याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. मात्र प्रत्यक्षात जेव्हा तिला मोती मिळू लागले, तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला.

  • Published by:  desk news

न्यूयॉर्क, 14 डिसेंबर: आपल्या आवडीचं सी-फूड (Sea food) खाता खाता एका महिलेला (Woman) चक्क मोती (Pearls) मिळाले आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. अनेकांना समुद्री मासे (Sea fish) खाण्याची हौस असते. समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना तर रोजच्या रोज सी-फूड खाण्याची सवय असते. मात्र जी व्यक्ती लहानपणापासून समुद्रकिनारी राहत नसेल आणि नंतर काही कारणांनी तिला किनारी प्रदेशात राहावं लागलं, तर ती व्यक्तीदेखील काही वर्षांत सी-फूडची चाहती झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसून येतात. यातील ऑयस्टर हे सी-फूड खाताना एका महिलेला अलभ्य लाभ झाला आणि तिनं आपला हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.

ऑयस्टर खाताना मिळाले मोती

अमेरिकेतील न्यू ऑरलियन्स शहरात राहणारी कीलि हिल नावाची महिला रोजच्याप्रमाणं जेवण करत होती. अलिकडेच तिनं सी-फूड खायला सुरुवात केली होती. त्यामुळे रोज नवनवे पदार्थ ट्राय करण्याची तिला हौस होती. त्या दिवशी तिने काही ऑयस्टर मागवले होते. हे ऑयस्टर खायला सुरुवात केल्यावर तिला अचानक काहीतरी कठीण पदार्थ दाताला लागला. तिने तो पदार्थ तोंडातून बाहेर काढून पाहिला, तर तो चक्क मोती होता. तिने तो मोती समोरच्या टीपॉयवर ठेवला.

मिळाले 12 मोती

कीलिने पुढचा ऑयस्टर खाल्ल्यानंतरही तिला तसाच अनुभव आला. काही ऑयस्टर मऊ होते, तर काही ऑयस्टरमध्ये मोती असल्याने ते टणक होते. त्यामुळे प्रत्येक ऑयस्टर खाताना ती जपून जपून चावत होती. मागवलेले सगळे ऑयस्टर जेव्हा संपले, तेव्हा एकूण 12 मोती तिच्याकडे जमा झाले होते.

हे वाचा- जपानी लोक पितात झुरळापासून बनवलेली बिअर; किंमत ऐकून व्हाल थक्क!

मोत्यांचा करणार हार

ऑयस्टरच्या पोटातून सापडलेल्या मोत्यांना बाजारात मोठी किंमत असते आणि ते मौल्यवान असतात, अशी माहिती कीलिला तिच्या एका नातेवाईकाने दिली. त्यानंतर ते मोती न विकता त्याची माळ करून गळ्यात घालण्याचा निर्णय़ तिने घेतला. आपला हा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

First published:

Tags: Food, Woman