मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पतीला घटस्फोट देत पाळीव कुत्र्यासोबत केलं लग्न; महिलेची अजब Love Story वाचून व्हाल थक्क

पतीला घटस्फोट देत पाळीव कुत्र्यासोबत केलं लग्न; महिलेची अजब Love Story वाचून व्हाल थक्क

अमांडा रोजर्स (Amanda Rodgers) नावाच्या या महिलेचा असा दावा आहे की ती आपल्या कुत्र्यासोबत लग्न केल्यानंतर अतिशय आनंदात आहे.

अमांडा रोजर्स (Amanda Rodgers) नावाच्या या महिलेचा असा दावा आहे की ती आपल्या कुत्र्यासोबत लग्न केल्यानंतर अतिशय आनंदात आहे.

अमांडा रोजर्स (Amanda Rodgers) नावाच्या या महिलेचा असा दावा आहे की ती आपल्या कुत्र्यासोबत लग्न केल्यानंतर अतिशय आनंदात आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 नोव्हेंबर : पती आणि पत्नीचा (Husband Wife Relationship) घटस्फोट होणं ही तशी काही नवीन बाब नाही. मात्र एखाद्याने पतीला सोडून आपल्या पाळीव प्राण्यासोबत लग्न केलं तर हे नक्कीच अजब वाटणारं आहे. यूनायटेड किंगडममध्ये एका महिलेनं 47 वर्षाच्या वयात आपल्या पतीला घटस्फोट दिला. यानंतर तिनं पाळीव कुत्र्याला आपला जोडीदार म्हणून निवडलं (Divorced Woman Married her Dog).

अमांडा रोजर्स (Amanda Rodgers) नावाच्या या महिलेचा असा दावा आहे की ती आपल्या कुत्र्यासोबत लग्न केल्यानंतर अतिशय आनंदात आहे. The Sun च्या वृत्तानुसार, 2014 साली तिनं अगदी वाजतगाजत लग्न केलं होतं. यानंतर 200 लोकांसमोर तिनं आपल्या डॉगी शेबाला आपला जोडीदार म्हणून निवडलं. महिला आता या मुक्या जीवासोबत इतकं चांगलं आयुष्य जगत आहे की इतक्या वर्षांच्या आधीच्या लग्नात ती इतकी आनंदी कधीच नव्हती.

क्रोएशियामध्ये राहणारी अमांडा आपल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर एकटीच राहात होती. यानंतर एक दिवस तिनं आपला पाळीव श्वान शेबासोबत प्रथा-परंपरेनुसार लग्नगाठ बांधली. तिनं त्याच्यासोबत जगण्या-मरण्याची शपथ घेतली आणि किस करत त्याला आपला लाईफ पार्टनर मानलं. आता अमांडा रोजर्सचं म्हणणं आहे, की शेबा तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. शेबा तिला हसवते, आनंदी ठेवते आणि कठीण काळात तिला आधारही देते. शेबा तिला कधीच त्रास देत नाही आणि तिची विशेष काळजीही घेते. एका टीव्ही शोमध्ये बोलताना महिलेनं सांगितलं की शेबा २ महिन्यांची असतानाच मला तिच्यावर प्रेम झालं आणि अखेर आम्ही लग्न केलंच.

अमांडाने सांगितलं की शेबाच्या डोळ्यांमध्ये तिला खरं प्रेम दिसलं. या कुत्र्यासोबत तिचं अतिशय खास नातं आहे. मजेशीर बाब म्हणजे अमांडा सांगते की शेबाला या लग्नाबद्दलही माहिती आहे. कुत्र्याला आपला जोडीदार बनवण्यासाठी अमांडाने गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं. याचं उत्तर कुत्र्याने आपली शेपटी हालवून हा असं दिलं होतं. आता अमांडा या श्वानासोबत अगदी आनंदी आयुष्य जगत आहे.

First published:

Tags: Marriage, Owner of dog