मराठी बातम्या /बातम्या /Viral /महिलेनं एकसोबतच दिला 4 मुलांना जन्म; आता अत्यंत वाईट झालीये दाम्पत्याची अवस्था, सांगितली व्यथा

महिलेनं एकसोबतच दिला 4 मुलांना जन्म; आता अत्यंत वाईट झालीये दाम्पत्याची अवस्था, सांगितली व्यथा

सँटिना मोनरियल (Santina Monreal) हिनं 2021 च्या सुरुवातीलाच एकसोबतच 4 मुलांना जन्म (Woman gave birth to 4 Babies) दिला.

सँटिना मोनरियल (Santina Monreal) हिनं 2021 च्या सुरुवातीलाच एकसोबतच 4 मुलांना जन्म (Woman gave birth to 4 Babies) दिला.

सँटिना मोनरियल (Santina Monreal) हिनं 2021 च्या सुरुवातीलाच एकसोबतच 4 मुलांना जन्म (Woman gave birth to 4 Babies) दिला.

नवी दिल्ली 10 सप्टेंबर : बाळाच्या जन्मानंतर आईला (New Mother) त्याचा योग्य सांभाळ करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशात घरात एकसोबतच चार मुलांचा जन्म झाला तर काय अवस्था होईल? याच परिस्थितीतून सध्या जात आहे अमेरिकेच्या (United States) कॅलिफोर्निया (California) राज्यात राहणारी सँटिना मोनरियल (Santina Monreal). तिनं 2021 च्या सुरुवातीलाच एकसोबतच 4 मुलांना जन्म (Woman gave birth to 4 Babies) दिला.

कधी पक्षाला चोरी करताना पाहिलंय का? चोरीचा हा VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

बाळांच्या जन्मानंतर त्यांचं आयुष्य एखाद्या मशिनप्रमाणेच सुरू झालं आहे. ती आणि तिचा पती मुलांचा सांभाळ करण्यातच थकून जातात. कपलनं म्हटलं, की त्यांनी कधी असा विचारही केला नव्हता की आयुष्य इतकं व्यस्त आणि थकवून टाकणारं होईल. सँटिनानं सांगितलं, की तिच्यासमोर चारही बाळांचं पोट भरणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. मुलांसाठी दुधाची सोय करायला तिला सकाळी तीन वाजताच उठावं लागतं. ती ब्रेस्टमिल्क पंप करून ठेवते. कारण या चौघांनाही सोबतच भूक लागते. चौघांचेही दररोज 40 नॅपी बदलावे लागतात. ऑनलाईन साईट मिररच्या वृत्तानुसार, 20 जानेवारी 2021 ला सँटिना आणि एड्रियन यांना चार बाळं झाली. यातील दोन मुली तर दोन मुलं आहेत.

ओव्हरटेक करणाऱ्या व्हॅनला ट्रॅक्टरची जोरदार धडक; अपघाताचा थरारक VIDEO

सँटिना एक प्रॉपर्टी मॅनेजर आहे. सँटिना आणि तिचा पती अनेक वर्षांपासून पालक बनण्याची वाट पाहत होते. यासाठी त्यांनी भरपूर पैसे खर्च करून आययूआयची मदतही घेतली. 2 वेळा हा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्यांना समजलं की सँटिनाच्या गर्भात 4 भ्रूण वाढत आहेत. चार मुलांच्या जन्मानंतर हे कपल भरपूर आनंदी झालं मात्र त्यांचं जीवन अतिशय व्यस्त झालं. मुलांच्या खाण्या-पिण्याची काळजी घेण्यापासून त्यांचे कपडे धुण्यापर्यंत दोघांनाही दिवसरात्र मेहनत करावी लागते. मात्र, तरीही हे जोडपं आपल्या मुलांच्या आगमनामुळे आनंदी आहे.

First published:
top videos

    Tags: Mother, Small baby, Viral news