हे फक्त स्त्रीच करू शकते! परीक्षेआधी सुरू झाल्या प्रसुती वेदना, आधी बाळाचा जन्म मग केला पेपर पूर्ण

हे फक्त स्त्रीच करू शकते! परीक्षेआधी सुरू झाल्या प्रसुती वेदना, आधी बाळाचा जन्म मग केला पेपर पूर्ण

एक महिला करू शकत नाही, असं कदाचित या जगात काही कामच नाही.

  • Share this:

शिकागो, 13 ऑक्टोबर : एक महिला करू शकत नाही, असं कदाचित या जगात काही कामच नाही. या वाक्यावर विश्वास बसत नसेल तर ही बातमी वाचून तुमचा नक्की विश्वास बसेल. अमेरिकेतील इलियॉन येथे राहणारी ब्रायना हिल परीक्षा देत होती. परीक्षा सुरू होण्यासाठी केवळ 30 मिनीटांचा कालावधी होती. ब्रायना शिकागो लॉ स्कूलमधून वकीलीची परीक्षा देत होती. मात्र परीक्षा सुरू होण्याआधीच ब्रायनाला प्रसुती वेदना सुरू झाल्या.

वाचा-5 लाखांना ऑनलाइन विकत घेतली मांजर, बॉक्स उघडला तर त्यात होता वाघाचा बछडा

सीएनएननं दिलेल्या वृत्तानुसार, ब्रायनाला परीक्षा सुरू होण्याआधी 30 मिनिटं प्रसुती वेदना सुरू झाल्या. तिला वेदना सहन होत नव्हता. वेदना होत असतानाही ती परीक्षेला बसली. मात्र तिला वेदन सहन न झाल्यानं तिनं नवऱ्याला बोलवण्यास सांगितले, त्यानंतर ब्रायनाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता ब्रायना रुग्णालयात दाखल झाली. मात्र ब्रायनाची प्रसुती रात्री 10 वाजता झाली. दुसऱ्या दिवशी तिचा दुसरा पेपर होता, अखेर विद्यापीठाची परवानगी घेऊन ब्रायनानं रुग्णालयात दुसरा पेपर दिला.

वाचा-सोन्याची खाण नाही सोन्याचं झाड! PHOTO पाहून तुम्हीही म्हणाल 'असली सोना'

ब्रायनानं यावेळी रुग्णालय प्रशासनाचे आणि विद्यापीठाचे आभार मानले. ब्रायनाचा निकाल अद्याप आला नसला तरी, तिच्या लेकीला नक्कीच आईचा अभिमान वाटेल.

Published by: Priyanka Gawde
First published: October 13, 2020, 3:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading