मराठी बातम्या /बातम्या /Viral /अजबच! 40 वर्षांपासून एक मिनिटही झोपली नाही ही महिला; आज आहे अशी अवस्था

अजबच! 40 वर्षांपासून एक मिनिटही झोपली नाही ही महिला; आज आहे अशी अवस्था

सध्या महिलेचं वय 45-46 वर्ष असून तिनं असा दावा केला आहे, की मागील 40 वर्षात ती एका मिनिटासाठीही झोपलेली नाही. जेव्हा ती शेवटचं झोपली होती तेव्हा तिचं वय 5 ते 6 वर्ष होतं.

नवी दिल्ली 04 सप्टेंबर : आजपर्यंत तुम्ही अनेक असे लोक पाहिले असतील जे रात्री व्यवस्थित झोप (Sleep) येत नसल्यानं चिंतेत असतील. अनेक असे लोकही असतात ज्यांनी दिवस असो किंवा रात्र पण झोपण्याची आवड प्रचंड असते आणि संधी मिळताच ते झोप घेतात. मात्र, आता एक अजब प्रकरण (Weird News) समोर आलं आहे. यात चीनमध्ये (China) राहणारी एक महिला मागील 40 वर्षांपासून एका मिनिटासाठीही झोपलेली (Woman Hasn't Slept for Past 40 Years) नाही.

VIDEO: कोंबड्यासोबत पंगा घेणं भोवलं; तरुणाची झाली भलतीच फजिती, अक्षरशः फुटला घाम

चीनच्या हेनान येथील रहिवासी असलेली ज्हानयिंग आपल्या झोपेसंबंधीच्या आजारानं (Weird Disease) त्रस्त आहे. सध्या तिचं वय 45-46 वर्ष असून महिलेनं असा दावा केला आहे, की मागील 40 वर्षात ती एका मिनिटासाठीही झोपलेली नाही. जेव्हा ती शेवटचं झोपली होती तेव्हा तिचं वय 5 ते 6 वर्ष होतं.

महिलेचा पती लियू सुओक्विन यानं ली हिचा हा दावा खरा असल्याचं म्हटलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की रात्री टाईमपास करण्यासाठी ली घरातील कामं करत असते. सुरुवातील लियू यांनी आपल्या पत्नीसाठी झोपेच्या गोळ्या (Sleeping Pills) आणल्या मात्र त्यानंही काही फायदा झाला नाही.

VIDEO: सेल्फीच्या नादात संकटही नाही दिसलं; बकरीनं महिलेला थेट जमिनीवर आपटलं

ली आपल्या गावात बरीच लोकप्रिय आहे. अनेकदा ली खरं बोलते का हे पाहण्यासाठी गावातील लोक तिच्या घराबाहेर रात्रभर पत्ते खेळत बसतात. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर या लोकांनाच झोप लागते मात्र ली जागीच राहते. ली हिनं अनेक डॉक्टरांकडे जात तपासणीही केली आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याही डॉक्टरांना यासाठीचे उपचार किंवा याचं कारण समजलेलं नाही.

First published:

Tags: Sleep, Viral news