कार सुरू करताच येऊ लागले विचित्र आवाज; आत डोकावून पाहाताच महिलेला बसला धक्का

महिलेची कार (Car) एडिनबर्गजवळ एका तलावाशेजारी पार्क करण्यात आली होती. तिनं कार सुरू करण्याचा प्रयत्न करताच कारमधून विचित्र आवाज येऊ लागले.

महिलेची कार (Car) एडिनबर्गजवळ एका तलावाशेजारी पार्क करण्यात आली होती. तिनं कार सुरू करण्याचा प्रयत्न करताच कारमधून विचित्र आवाज येऊ लागले.

  • Share this:
    नवी दिल्ली 15 जून: माणसानं आपल्या स्वर्थासाठी जंगलतोड केली. याचे परिणामी असे झाले, की जंगली प्राणी (Animals) आता मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. अनेकदा तर लोकांच्या घरांमध्ये असे प्राणी आढळतात, ज्यांच्याबद्दल तुम्ही विचारही करू शकत नाही. केवळ घरांमध्येच नाही तर इतर ठिकाणीही अनेकदा असे प्राणी आढळतात. कधी रस्त्याच्या कडेला तर कधी इतर ठिकाणी हे प्राणी आढळतात. नुकतंच स्कॉटलँडमधील (Scotland) एका महिलेच्या कारमध्ये असा प्राणी दिसला ज्याबद्दल तिनं विचारही केला नव्हता. महिलेची कार एडिनबर्गजवळ एका तलावाशेजारी पार्क करण्यात आली होती. तिनं कार सुरू करण्याचा प्रयत्न करताच कारमधून विचित्र आवाज येऊ लागले. महिलेला सुरुवातीला हेच समजलं नाही की हे आवाज कुठून येत आहेत. हे तपासण्यासाठी तिनं कारचं इंजिन कम्पार्टमेंट तपासण्याचा निर्णय घेतला. तिनं आतमध्ये पाहिलं असता महिला जोरानं ओरडली. आतमध्ये एक पाणमांजर बसलेलं होतं. VIDEO: बापरे! तरुणीनं एका हातानं पकडला विषारी साप, धाडसाचं होतंय कौतुक स्क़ॉटलँडच्या प्राणी मित्रासाठी ही अत्यंत नवीन स्थिती होती. आजपर्यंत त्यांनी कधीही गाडीमध्ये अडकलेल्या पाणमांजराला बाहेर काढलेलं नव्हतं. रेस्क्यू टीममधील (Animal Rescuer) एकानं सांगितलं, की गाडी तलावाजवळ पार्क केलेली होती. ही गाडी लॉक केलेली होती. तरीही हे पाणमांजर गाडीच्या इंजिनमध्ये कसं शिरलं, हे समजू शकलं नसल्याचं त्यांनी म्हटलं. मुलीचा 35 हजाराचा बेल्ट पाहून आई चक्रावलीच; रिअ‍ॅक्शनचा भन्नाट VIDEO VIRAL या टीमनं आपल्या फेसबुक पेजवर पाणमांजराचा फोटो पोस्ट केला आहे. या पाणमांजराला बाहेर काढलं गेलं, तेव्हा ते खूप घाबरलेलं होतं. टीमनं त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत त्यानं तिथून पळ काढला. त्याला कोणत्याही प्रकारची मेडिकल हेल्प देण्यात आली नाही. यानंतर महिलेच्या कारमधून येणारे आवाज बंद झाले.
    Published by:Kiran Pharate
    First published: