Home /News /viral /

3 वर्षांपूर्वी निधन झालेले वडील अचानक Google Map वर दिसले; पाहून शॉक झाली महिला, जाणून घ्या सत्य

3 वर्षांपूर्वी निधन झालेले वडील अचानक Google Map वर दिसले; पाहून शॉक झाली महिला, जाणून घ्या सत्य

महिलेच्या वडिलांचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं होतं, मात्र अचानक गुगल मॅपवर तिला आपले वडील दिसले

    नवी दिल्ली 13 डिसेंबर : आपल्या जवळच्या व्यक्तीचं आयुष्यातून जाणं, अतिशय वेदनादायी असतं. विशेषतः आई-वडील आपल्याला हे सुंदर आयुष्य देतात आणि त्यांच्याच सानिध्यात आपण एक सुंदर आयुष्य जगतो. त्यांच्या निधनानंतर सोबत फक्त आठवणीच राहतात. अशात जर त्यांच्याबद्दल आपल्याला काहीही नवीन समजलं तर हा आनंद गगनात मावत नाही आणि आपली उत्सुकताही प्रचंड वाढते. काही वर्षांपूर्वी एका महिलेसोबतही असंच घडलं. महिलेच्या वडिलांचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं होतं, मात्र अचानक गुगल मॅपवर तिला आपले वडील दिसले (Woman Saw Dead Father on Google Map). पहिल्यांदा डेटवर गेलेल्या तरुणीने सांगितला विचित्र अनुभव; युवकाने केलं अजब कृत्य इंग्लंडच्या कॉर्नवॉलमध्ये राहणारी ट्विटर यूजर (Twitter User) कारेन हिने याच वर्षी जून महिन्यात एक ट्विट केलं, जे चांगलंच व्हायरल झालं. महिलेनं सांगितलं, की ती गुगल मॅपच्या स्ट्रीट व्ह्यू (Google Map) फिचरच्या माध्यमातून आपलं घर पाहात होती. इतक्यात अचानक तिला आपले वडील दिसले. हैराण करणारी बाब म्हणजे कारेनच्या वडिलांचं तीन वर्षापूर्वी निधन झालं होतं. गुगल मॅपच्या स्ट्रीट व्ह्यूमध्ये कारेन जो फोटो पाहात होती, तो तिच्या पित्याच्या मृत्यूच्या आधीचा होता. गुगलची ही सेवा प्रत्येक महिन्याला अपडेट होत नाही. बऱ्याच दिवसांनी ती अपडेट होते. अशात कारेन आपलं घर पाहत असताना तिला वडिलांचा फोटो दिसला. यात तिचे वडील गार्डेनिंग करताना दिसत होते. महिलेनं सांगितलं की गार्डनिंग करणं तिच्या वडिलांना खूप आवडायचं. महिलेचं लक्ष जेव्हा या फोटोवर गेलं तेव्हा ती हैराण झाली. भर मैदानात खेळाडूनं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, VIDEO पाहून येईल डोळ्यांत पाणी कारेनचं हे ट्विट 51 हजारहून अधिकांनी लाईक केलं आहे तर जवळपास 3 हजार जणांनी रिट्विट केलं आहे. कारेनची ही पोस्ट अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. कारेनची ही पोस्ट पाहून नेटकरीही भावुक झाले आहेत. एका व्यक्तीने तर कारेनला अतिशय सुंदर गिफ्ट दिलं. त्यानं कारेनच्या वडिलांच्या या फोटोचं चित्र रेखाटलं. या व्यक्तीचं म्हणणं होतं की गुगल मॅप कधी ना कधी अपडेट होईल आणि हा फोटो इथून जाईल. मात्र पेटिंग नेहमी सोबत राहील.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Google, Viral post

    पुढील बातम्या