मुंबई, 1 एप्रिल- महिलांना सरप्राईजेस आवडतात. त्यातही जर एखाद्या डिनर डेटला गेल्यावर सरप्राईज मिळालं तर आनंद द्विगुणित होतो. टेक्सासच्या एका महिलेबाबत हिच गोष्ट घडली आहे. रोमँटिक डेटला गेलेली असताना स्वादिष्ट जेवणासोबतच तिला त्यात आणखी एक गोष्ट मिळाली. त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिनं टिकटॉकवर याचा व्हिडिओ शेअर केला व त्याला लोकांनी खूप प्रतिसाद दिला.
टेक्सासमध्ये राहणारी केनिया मॅक ही महिला रोमँटिक डिनरला गेली होती. तिच्या जोडीदारासोबत ती स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेत होती, तेव्हा अचानक तिला एक मौल्यवान गोष्ट दिसली. त्यामुळे तिला झालेला आनंद पाहून तिचा जोडीदारही अवाक झाला. जोडीदारानं काही विचारायच्या आधीच तिनं तिला मिळालेली ती मौल्यवान वस्तू त्याला दाखवली. जेवणाच्या डिशमध्ये तिला ती वस्तू मिळाली.
वाचा-कसा असेल 1 एप्रिलचा दिवस? लवकरच तुमची एखादी छोटी सहल घडेल
केनिया हिनं लगेचच त्याचा एक व्हिडिओ करून टिकटॉकवर शेअर केला. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. पार्टनर जुआन मॅन्युअल याच्यासोबत डलास इथं एका सीफूड रेस्टॉरंटमध्ये डिनरला गेली असताना तिला एका डिशमध्ये चमकणारी एक वस्तू दिसली. ऑयस्टर म्हणजे शिंपल्याचा पदार्थ खात असताना तिला त्यात एक चमचमणारी गोष्ट दिसली. ती वस्तू म्हणजे मोती होती. त्या व्हिडिओमध्ये तिनं स्वतःच्या हातावर तो मोती ठेवलेला दिसतो आहे. हा छोटा असला तरी मोतीच आहे, असं मूळची मेक्सिकोची असणारी केनिया हिनं म्हटलंय. तिनं शेअर केलेल्या व्हिडिओला आत्तापर्यंत 7 लाख 70 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी याबाबत विश्वास वाटत नसल्याचं म्हटलंय, तर काहींनी तो खरोखर मोती असून हे मोती महाग असल्याचंही म्हटलंय. Thepearlsource च्या मते केनिया हिला या मोत्याच्या बदल्यात हजारो डॉलर्स मिळू शकतात. मात्र तिनं अजून त्या मोत्याचं मूल्यांकन केलेलं नाही. गेल्या वर्षी न्यू जर्सी इथं एका दाम्पत्याबाबत अशीच घटना घडली होती.
वाचा- एप्रिलच्या 1 तारखेलाच का बनवलं जातं मूर्ख? खूप रंजक आहे एप्रिल फूलचा किस्सा
केनिया हिची डिनर डेट मोती मिळाल्यामुळे खरोखरच मौल्यवान ठरली. तिनं लगेचच तिचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला. त्यालाही युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिंपल्यामध्ये सापडणारे मोती खूप मौल्यवान असतात. सध्या बनावट मोत्यांचा व्यापार जोमानं सुरू आहे. त्यामुळे अचानक एखादा खरा मोती सापडला, तर त्यापेक्षा मौल्यवान भेट असू शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.