Home /News /viral /

Yuck! हे काय आहे? एक घास चावताच अंड्यात दिसलं असं काही की...; हादरली महिला

Yuck! हे काय आहे? एक घास चावताच अंड्यात दिसलं असं काही की...; हादरली महिला

एग मफीनमधील अंड्यात महिलेला जे दिसलं ते पाहून तिला धक्काच बसला.

    लंडन, 04 मे : भूक लागली आणि काही बनवायचाही कंटाळा आला की आपण बाहेर जाऊन काहीतरी खातो किंवा घरी ऑर्डर करतो. एका महिलेनेही आपल्या घरी असंच एग मफीन ऑर्डर केलं. त्याचा एक घास चावताच तिला अंड्यात असं काही सापडलं की तिला धक्काच बसला. तिने उलटीही केली (Egg yellow yolk turn grey). यूकेतील मॅनचेस्टरमध्ये राहणारी 32 वर्षांची किम. जिने मॅकडीवरून आपल्यासाठी मफिन आणि सॉसेज ऑर्डर केले होते. तिला खूप भूक लागली होती. त्या भुकेबरोबर तिने घाईत ते मफिन खाल्लं पण त्यानंतर ती शॉक झाली. कारण त्या मफिनमधील अंड्याच्या आत पिवळा भागच नव्हता. त्याऐवजी करड्या रंगाचा भाग दिसत होता. अंड्यातील जो भाग पिवळा असतो तो करडा झाला होता. ते पाहूनच तिला उलटी आल्याचं तिने सांगितलं. मफिनची चवही विचित्र होती. त्यामुळे अंड खराब झालं होतं, असं ती म्हणाली.  यानंतर तिने लगेच मॅकडीकडे तक्रार केली. हे वाचा - Shocking! उकळत्या तेलात चमच्याऐवजी हातानेच तळल्या भजी; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO  मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार मॅकडीने मात्र आपला पदार्थ खराब असल्याचं नाकारलं. आपल्याकडे ताज्या अंड्याचाच वापर होतो. असं खराब अंड सापडणं अशक्यच आहे. केमिकल रिअॅक्शनमुळे अंड्याचा बलक ग्रे रंगाचा झाल्याचं स्पष्टीकरण मॅकडीने दिलं. त्यानंतर मॅकडीच्या  स्टाफने मफिन फेकून दिलं आणि महिलेला त्याऐवजी दुसरं मफिन देऊ केलं. पण तिने ती ऑफर नाकारली. एका अंड्याची अशी अवस्था पाहून दुसरं मफिन खाण्याची तिची इच्छाच झाली नाही, असं ती म्हणाली. चिकन रोलमध्ये कोळी काही महिन्यांपूर्वीच यूकेच्या चेशायरमध्ये राहणाऱ्या कॅटीने मॅकडोनाल्ड्समधून चिकन आणि बेकन रोल (Mac D Chicken Wrap) ऑनलाईन ऑर्डर केले होते. तिने रोल खाल्ला त्यानंतर तिला दातात काहीतरी विचित्र चावल्यासारखं वाटलं. तिने चावलेला घास तोंडाबाहेर काढला. तेव्हा त्यात जे दिसलं ते पाहून तिला उलटीच आली. चिकनमध्ये दुसरं तिसरं काही नाही तर चक्क एक कोळी होता. हे वाचा - कुटुंबाने घरात पाळला भलामोठा कोळी; वर्षभरानंतर... पाहूनच सर्वांना फुटला घाम कंपनीने तिची माफी मागत तिला रिफंड आणि रिप्लेसमेन्ट वाऊचर ऑफर केलं. पण कॅटीने आपण आता पुन्हा इथून फूड मागवणार नसल्याचं स्पष्ट केलं. बर्गरमध्ये सापडला होता विंचू गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतातही असंच एक प्रकरण समोर आलं होतं. हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या बर्गरमध्ये (Scorpion found inside burger in the hotel) चक्क विंचू सापडला होता. तरुणाने बर्गरचा पहिला घास चावताच त्याला विचित्र चव लागल्याने त्याने घास तोंडातून बाहेर काढला. पाहतो तर काय? विंचूचा अर्धा भाग त्यात होता. मग त्याने बर्गर उघडून पाहिल्यावर त्यात मेलेला विंचू असल्याचं दिसून आलं. असा बर्गर खाल्ल्याने तरुणाची  तब्येतही बिघडली होती.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Food, Viral, Viral news, Viral photo

    पुढील बातम्या