मुंबई 27 ऑक्टोबर : पुरुषाचं मन जिंकायचं असेल, तर त्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, असं म्हणतात. म्हणजेच चांगलं जेवण तयार करून खाऊ घातल्यास पुरुषाचं मन जिंकणं सोपं असतं. आता ही म्हण पाकिस्तानातील एका जोडप्याने खरी करून दाखवली आहे. पण या कथेत एक फरक आहे, तो म्हणजे इथे तरुणीने पुरुषाचं मन जिंकलं नाही, तर पुरुषाने त्याच्या हातांनी जेवण तयार करून तरुणीला खाऊ घातलं आणि ती महिला त्याच्या प्रेमात पडली. या दोघांची ‘लव्ह स्टोरी’ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
एका रिपोर्टनुसार दोघांच्या वयामध्ये तब्बल 33 वर्षांचं अंतर आहे. आलियाचं वय 22 आणि रफिकचं वय 55 आहे. दोघं प्रेमात पडले आणि नंतर दोघांनी लग्न केलं. दोघांची पहिली भेट एका रिक्षात झाल्याचं बोललं जातंय. या दोघांच्या पहिल्या भेटीचा किस्साही फार खास होता. वाचूयात ही फिल्मी स्टाईलची ‘लव्ह स्टोरी’.
कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं कमी केलं तब्बल 112 किलो वजन, सांगितलं आपलं सीक्रेट
दोघांची पहिली भेट झाली तेव्हा आलिया रफिकला नीट ओळखत नव्हती. पहिल्याच भेटीत दोघांमध्ये भांडण झालं होतं. प्रकरण इतकं टोकाला गेलं, की आलियाने रफिकला कानशिलात मारली होती. यानंतर रफिकने आलियाला स्वतः तयार केलेलं मटण खायला दिलं अन् त्यानंतर संपूर्ण कथाच पलटली, त्यांची दिलजमाई झाली.
यूट्युबरने शेअर केली आलिया-रफिकची ‘लव्ह स्टोरी’
पाकिस्तानी यूट्युबर सय्यद बासित अलीने या कपलची गोष्ट शेअर केली आहे. आलियाला रिक्षात भेटल्याचं रफिकने सांगितलं. त्यावेळी त्यांच्यात भांडण झालं आणि आलियाने त्याला थोबाडीत मारली. आलिया रिक्षातून उतरल्यानंतर रफिक तिचा पाठलाग करत तिच्या घरी पोहोचला. रफिक अनेक दिवस आलियाच्या घरी जात राहिला; पण काही फायदा झाला नाही. मग एकेदिवशी रफिकने आलियाशी नोकरीबद्दल बातचीत केली आणि त्याला चांगलं जेवण तयार करता येत असल्याचं सांगितलं. तसंच त्याला इतर कामंही जमत असल्याचं तो म्हणाला.
Shocking! 67 वर्षांनी पहिल्यांदाच अंघोळ केली आणि गेला जीव; जगातील सर्वात घाणेरड्या व्यक्तीचा मृत्यू
यानंतर रफिकला आलियाच्या घरी नोकरी मिळाली. आलियाच्या सांगण्यावरून रफिकने पहिल्याच दिवशी खास मटण हंडी बनवली. आलियाला ही डिश इतकी आवडली, की ती रफिकच्या प्रेमात पडली. आलिया म्हणते की, रफिकसारखं जेवण दुसरं कोणीच तयार करू शकत नाही. रफिक घरकाम करतो आणि आलिया ऑनलाइन बिझनेस करते. दोघांच्या वयात तब्बल 33 वर्षांचं अंतर होतं, पण असं म्हणतात, की प्रेमाला वयाचं बंधन नसतं. तेच सिद्ध करत रफिक आणि आलिया दोघांनी लग्न केलं आणि आता सोबत राहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love story, Viral news