मराठी बातम्या /बातम्या /Viral /झाडावर स्टंट करणं भोवलं; फांदी तुटताच उंचावरुन धाडकन खाली पडली महिला, घटनेचा Live Video

झाडावर स्टंट करणं भोवलं; फांदी तुटताच उंचावरुन धाडकन खाली पडली महिला, घटनेचा Live Video

व्हिडिओमध्ये पुढे दाखवण्यात आलं आहे की, या महिलेनं पुन्हा एकदा प्रयत्न करून झाडाच्या फांदीवर आपले दोन्ही पाय ठेवले. मात्र इतक्यात फांदी तुटते आणि ही महिला असंतुलित होऊन धाडकन जमिनीवर कोसळते

व्हिडिओमध्ये पुढे दाखवण्यात आलं आहे की, या महिलेनं पुन्हा एकदा प्रयत्न करून झाडाच्या फांदीवर आपले दोन्ही पाय ठेवले. मात्र इतक्यात फांदी तुटते आणि ही महिला असंतुलित होऊन धाडकन जमिनीवर कोसळते

व्हिडिओमध्ये पुढे दाखवण्यात आलं आहे की, या महिलेनं पुन्हा एकदा प्रयत्न करून झाडाच्या फांदीवर आपले दोन्ही पाय ठेवले. मात्र इतक्यात फांदी तुटते आणि ही महिला असंतुलित होऊन धाडकन जमिनीवर कोसळते

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 23 मार्च : सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. बहुतेक कंटेंट क्रिएटर्स एकमेकांपेक्षा चांगला आणि खतरनाक स्टंट करून दाखवण्याच्या प्रयत्नात असतात. कारण हे स्टंट व्हिडिओ लोकांचं लक्ष वेधून घेतात आणि हे व्हायरलही मोठ्या प्रमाणात होतात. पण कधी कधी डाव उलटा पडतो आणि हा स्टंट चांगलाच महागात पडतो. असाच काहीसा प्रकार सध्या व्हायरल झालेल्या मजेशीर व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला आहे, ज्यामध्ये एका महिलेला स्टंट करणं चांगलंच भोवलं.

बापरे! तरुणांनाही जमणार नाही असा वृद्धाचा खतरनाक बाईक स्टंट, VIDEO एकदा पाहाच

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला झाडाला लटकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ही महिला झाडाच्या फांदीवर उडी मारून पाय ठेवण्याचा अनेकवेळा प्रयत्न करते, जेणेकरून ती माकडासारखी झाडाला घट्ट पकडून काहीतरी वेगळं करून दाखवू शकेल. व्हिडिओमध्ये पुढे दाखवण्यात आलं आहे की, या महिलेनं पुन्हा एकदा प्रयत्न करून झाडाच्या फांदीवर आपले दोन्ही पाय ठेवले. मात्र इतक्यात फांदी तुटते आणि ही महिला असंतुलित होऊन धाडकन जमिनीवर कोसळते. हे संपूर्ण दृश्य पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

व्हिडिओ पाहताना जाणवतं की फांदी तुटून खाली पडलेल्या महिलेला भरपूर मारही लागला आहे. धाडकन पडल्यानंतर बराच वेळ ती त्याच ठिकाणी पडून राहते आणि ती वेदनेनं ओरडत असल्याचं जाणवतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

झाडाला लटकून स्टंट दाखवण्याच्या प्रयत्नात महिला कशी खाली पडते हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. हा व्हिडिओ ट्विटवर peoplerepentlng नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. शेअर केल्यापासून हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखहून अधिक लोकांनी पाहिला असून या व्हिडिओला हजारो लाईक्सही मिळाले आहेत. बहुतेक लोकांनी व्हिडिओवर हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत. तर, अनेक वापरकर्त्यांनी ही घटना वेदनादायक असल्याचं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Funny video, Stunt video